‘मंत्री दादा भुसे’ यांची युवकाला शिविगाळ; आव्हाड यांच्याकडून व्हिडिओ ट्वीट

162

राज्यात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर चिखलफेक करत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री दादा भुसे पोलिसांसमोर एका युवकाला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ ट्वीट केला आहे. या व्हिडिओत मंत्री दादा भुसे पोलिसांसमोर एका युवकाला शिविगाळ करताना दिसत आहेत. त्यामुळे आता मंत्री भुसेंवर कारवाई करणार का , त्यांच्यावर कोणता गुन्हा लावणार, असे सवाल आव्हाड यांनी विचारले आहेत.

( हेही वाचा: सीमावादाबाबत इतरांनी शिकवू नका; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला )

ट्वीटमध्ये काय?

आव्हाड यांनी मंत्री दादा भुसे यांचा एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. माझा नग्न फोटो फेसबुकवर टाकणा-याला आपण मांडीवर बसवले आहेत. माझी सीबीआय चौकशी लागावी, म्हणून सर्वोच्च न्यायालयात वकिलांची फौज उभी केली. माझ्यावर आरोप करणा-या महिलेची आपण भेट घेतली. मुख्यमंत्रीसाहेब आपण दोघे मित्र आहोत, हेही तुम्ही विसरलात, आता पोलिसांसमोर युवकाला फटकावणा-या मंत्री भुसेंवर आपण कोणती कारवाई करणार ? त्यांच्यावर कोणता गुन्हा लावणार? असे सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.