Lok Sabha Election 2024: मंत्री Deepak Kesarkar यांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

287
Lok Sabha Election 2024: मंत्री Deepak Kesarkar यांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

हिंदुत्व सोडून काँग्रेस सोबत गेलेल्या उद्धव ठाकरेंबाबत (Uddhav Thackeray) मुस्लिम समाजाला खात्री झाल्याने त्यांनी लोकसभा निवडणुकीत (Lok sabha election 2024) फतवे काढून ठाकरे गटाच्या उमेदवारांना एकगठ्ठा मतदान केले. मुस्लिम मतांमुळेच (Muslim voting) त्यांचे उमेदवार निवडून आले, असा थेट व गंभीर आरोप राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Education Minister Deepak Kesarkar) यांनी बुधवारी बाळासाहेब भवन या पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केला. त्याचवेळी निवडणुकीतील महायुतीचा पराभव आम्ही मान्य करत असून चुकलेल्या गोष्टी दूर करुन नव्या दमाने जनतेसमोर पुन्हा जाऊ, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. (Lok Sabha Election 2024)

ते पुढे म्हणाले की, गेल्या दोन दिवसापासून उद्धव ठाकरेंकडून महाराष्ट्रात एक वेगळे चित्र तयार केले जात असून ज्यात मराठी मतदार शिवसेनेसोबत नाहीत, असा दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र १३ पैकी ७ ठिकाणी आम्ही ठाकरे गटाच्या उमेदवारांचा पराभव केला. सगळी मुंबईकरांची मते आणि मराठी मते शिवसेनेला मिळाली. मुंबईतील ८० टक्के मतदारही शिवसेनेसोबतच होती, असा दावाही केसरकर यांनी केला.

(हेही वाचा – North West Lok Sabha : मतमोजणीत नक्की काय घडले?, काय म्हणतात निवडणूक निर्णय अधिकारी)

ज्या ६ ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव झाला तिथे उमेदवारी उशीरा जाहीर केल्याने फटका बसला असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट शब्दात मान्य केले. मात्र उध्दव ठाकरे यांच्या उमेदवारांसाठी मुंबईत फतवे काढण्यात आले होते. अन्यथा त्यांचे उमेदवार एक ते दीड लाख मतांनी पराभूत झाले असते, असाही दावा केसरकर यांनी केला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पराभूत करण्याचा कट पाकिस्तानात रचण्यात आला होता. पाकिस्तानमधील दोन मंत्री मोदींच्या पराभवाचे आवाहन करत होते आणि इथले काहीजण ते ऐकत होते हे दुर्देवी असून निवडणुकीत संविधान बदलणार असा खोटा प्रचार करुन दलित बांधवांची दिशाभूल करण्यात आली. मराठा आंदोलनादरम्यान मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण झाला. मात्र निवडणुकीत काही ठिकाणी ठरवून मतदान झाले. ज्यामुळे महायुतीच्या बड्या नेत्यांचा पराभवही झाला याचेही विश्लेषण होणे आवश्यक असल्याचे केसरकर यांनी नमूद केले. 

(हेही वाचा – Vidhan Parishad Election 2024 : शिवसेनेची भाजपावर कुरघोडी)

ज्या शिवसेनेची कोकणातून सुरुवात झाली त्या सिंधुदूर्गपासून पालघरपर्यंत उद्धव ठाकरे यांना एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे कोकणी जनताही शिवसेनेच्या पाठिशी आहे हे यातून दिसून आले. कोकणातील जनतेने नारायण राणे यांना निवडून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा या देशाचे नेतृत्व करावे, असा सुस्पष्ट कौल दिला आहे. त्यामुळे तुम्हाला विरोधी पक्ष म्हणून कौल मिळाल्याचे सांगत, बाळासाहेबांनी सत्तेची पर्वा केली नाही. महाराष्ट्राबाबत प्रेम असेल तर उद्धव ठाकरेंनी दिल्लीत जाऊन शरद पवार यांना विरोधी पक्षनेते पद मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असा सणसणीत टोलाही केसरकर यांनी लगावला. (Lok Sabha Election 2024)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.