गडचिरोलीत नक्षलवाद्यांना मोठ्या संख्येने ठार करण्यात आले आहे, त्याचा बदला नक्षलवादी घेणार, अशी धमकी नक्षलवाद्यांनी गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्या नावाने दिली. मात्र या धमकीला भीक न घालता एकनाथ शिंदे थेट गडचिरोलीत दाखल झाले. त्यांनी पोलिसांची भेट घेऊन त्यांचे मनोधैर्य वाढवले.
#गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने #भामरागड येथील दुर्गम भागातील दोदराज पोलीस स्थानकाला भेट देऊन तेथील पोलीस जवानांच्या सोबत #दिपावाली सण साजरा केला. pic.twitter.com/uYB6b9hb2B
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 30, 2021
धमक्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही!
गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील दुर्गम भागातील दोदराज पोलिस ठाण्याला भेट दिली. इतकेच नाही तर तिथल्या पोलिस जवानांच्या सोबत दिवाळीचा सणही शिंदे यांनी साजरा केला. अशा धमक्या खूप येतात. त्या धमक्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. धमक्यांबाबत ठाणे पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ते तपास करत आहेत. धमक्यांचा परिणाम यापूर्वीही झाला नाही आणि आताही होणार नाही. गडचिरोलीच्या विकासाचे माझे काम सुरुच राहील, असे आश्वासक मत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गडचिरोली दौऱ्यात व्यक्त केले आहे. नक्षली कारवायांमुळे अतिसंवेदनशील असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भगात सणवार सोडून आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस जवानांना यावेळी दिवाळीच्या खास शुभेच्छा देऊन फराळाचे वाटप केले. यावेळी गडचिरोलीचे पोलिस उपमहानिरीक्षक संदिप पाटिल, जिल्हाधिकारी संजय मीना, पोलिस अधीक्षक अंकित गोयल हेदेखील उपस्थित होते.
(हेही वाचा : वरळीत कोळीबांधवांनी बंद पाडले कोस्टल रोडचे काम!)
Join Our WhatsApp Community