नवी मुंबईप्रमाणे ठाण्यातही यश मिळवण्याचा मंत्री Ganesh Naik यांचा निर्धार

78
नवी मुंबईप्रमाणे ठाण्यातही यश मिळवण्याचा मंत्री Ganesh Naik यांचा निर्धार
नवी मुंबईप्रमाणे ठाण्यातही यश मिळवण्याचा मंत्री Ganesh Naik यांचा निर्धार

भाजप नेते आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी ठाणे जिल्ह्यावरही आपले लक्ष केंद्रित केले असून, तिथेही प्रभावी कामगिरी करण्याचा त्यांचा निर्धार आहे. गणेश नाईक हे पूर्वी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले असून, त्यांना पुन्हा या जिल्ह्यात सक्रिय होण्याची इच्छा आहे.  (Ganesh Naik)

पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी दर तीन महिन्याला दोनदा जनता दरबार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर ठाणे जिल्ह्यातही दोन महिन्यातून एकदा  जनता दरबार भरवण्याचा त्यांनी संकल्प केला आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांचा अधिक सक्रिय सहभाग राहणार आहे.  (Ganesh Naik)

(हेही वाचा-Ayodhya : ‘पुढील काही दिवस अयोध्येत येणे टाळा…’, राम मंदिर ट्रस्टने भाविकांना का केले न येण्यासाठी अपील ? )

ठाणे जिल्हा राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या जिल्ह्यात सात महानगरपालिका येतात, त्यामुळे कोणत्याही पक्षासाठी येथे वर्चस्व मिळवणे फार महत्त्वाचे ठरते. मंत्री गणेश नाईक हे पूर्वी शिवसेनेत होते आणि त्यावेळी त्यांचे ठाणे जिल्ह्यावर विशेष लक्ष होते. आता भाजपमध्ये असतानाही त्यांची ठाणे जिल्ह्यातील राजकीय पकड मजबूत करण्याची इच्छा दिसत आहे.  (Ganesh Naik)

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे हा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, गणेश नाईक यांच्यासारखे अनुभवी नेते ठाण्यात पुन्हा सक्रीय होत असल्याने, भाजप आणि शिंदे गटामधील अंतर्गत समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.  (Ganesh Naik)

(हेही वाचा- जालना जिल्ह्यामध्ये 11 हजार ‎बांगलादेशी, रोहिंग्यांचे वास्तव्य ; Kirit Somaiya यांची धक्कादायक माहिती)

नवी मुंबईमध्ये त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी गणेश नाईक ओळखले जातात. आता त्यांनी ठाण्यातही असाच विकास करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील जनता दरबार, विकास प्रकल्प आणि स्थानिक राजकारणातील त्यांची भूमिका कशी असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Ganesh Naik)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.