‘देव करो आणि तिघांची युती होवो’, शिंदे गटाच्या मंत्र्याचे सूचक विधान

116

गेल्या काही दिवसांपासून भाजप-शिंदे गट आणि मनसे यांच्यातील महायुतीच्या चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. शिंदे-फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात सातत्याने होणा-या भेटीगाठी आणि सातत्याने नेत्यांनी युतीबाबत दाखवलेली सकारात्मकता यावरुन युतीची चर्चा रंगली असतानाच शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सूचक विधान केले आहे.

मनसे सोबतच्या युतीचा निर्णय हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेत्यांचा आहे. पण देव करो आणि तिघांची युती होवो, अशीच सगळ्यांची अपेक्षा असल्याचे विधान गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

पात्र अजून मोठं होईल

मनसे सोबत युती करायची की नाही हे आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेते ठरवतील. पण जेव्हा सर्व नद्या-नाले एकत्र येतात तेव्हा नदीचं पात्र हे आणखी मोठं होत जातं. त्यामुळच शिंदे गट, भाजप आणि मनसे हे तिन्ही पक्ष एकत्र आल्यावर पात्राचा विस्तार वाढेल, असे विधान बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आमदार आणि पाठीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

(हेही वाचाः मुलांना आता पुस्तकांसोबत वह्याही मिळणार मोफत, शिक्षणमंत्री केसरकर यांची मोठी घोषणा)

केसरकरांचे मत

शिंदे गटाचे आमदार आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी देखील युतीबाबत भाष्य केलं आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे बोलणार नाहीत तोपर्यंत याबाबत मी काहीही सांगणार नाही. पण एकत्र येऊन काम करणे हे काळाची गरज आहे, असे मत केसरकर यांनी व्यक्त केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.