काय दिलंय राजीनाम्याचं कारण?
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Medical Education Minister Hasan Mushrif) हे कोल्हापूरचे आहेत. त्यांना त्यांच्या मतदारसंघात वेळ देता येत नाही, म्हणून त्यांनी ही जबाबदारी सोडल्याचे कारण सांगितले आहे. महायुतीमध्ये गेल्या काही दिवसापासून रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावरुन तिढा सुरू आहे. हा तिढा सुटला नसताना आता वाशिमच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी मुश्रीफ यांनी सोडली आहे, यामुळे आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू आहेत.
(हेही वाचा – Sushil Kumar : दोनवेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या सुशील कुमारला नियमित जामीन मंजूर)
याबाबत हसन मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्यासोबत चर्चा केली आहे. दुसरीकडे दत्ता भरणे यांच्याकडे कोणत्याच जिल्ह्याचे पालकमंत्री पद नाही, यामुळे आता वाशिम जिल्ह्याची जबाबदारी भरणे यांच्याकडे जाणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community