महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड कायमच वादग्रस्त विधाने करून चर्चेत असतात. भिवंडी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना, डोकं शांत ठेवण्यासाठी रजनीगंधा पानसुपारी गुटखा, पानमसाला खा, असा अजब सल्ला मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना दिला.
काय म्हणाले आव्हाड ?
विरोधक कायम तुम्हाला भडकवतील, यात त्यांचा राजकीय स्वार्थ खूप मोठा आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही भडकवले तरीही डोके शांत ठेवा. डोक्यावर बर्फ ठेवा, शांत राहण्यासाठी रजनीगंधा पानसुपारी गुटखा, पानमसाला खा, मांस जास्त खाऊ नका, अशी विनंती मुस्लिम बांधवांना मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.
(हेही वाचा आफ्रिकेअगोदरच जगभरात पसरलाय कोरोनाचा नवा विषाणू! आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची भीती)
एसटी विलिनीकरणावर चर्चा सुरू
दरम्यान एसटी संपावर बोलताना आव्हाड म्हणाले, शरद पवारांनी कायम एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवले. काही राजकीय पक्षांनी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन समस्त महाराष्ट्राला वेठीस धरले. एसटी कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्या असून विलिनीकरणाच्या मागणीबाबत लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल. यावर समितीमार्फत चर्चा सुरू आहे असेही ते म्हणाले
Join Our WhatsApp Community