-
प्रतिनिधी
राज्याचे मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्यावर असलेल्या शिक्षेला नाशिक सत्र न्यायालयाने स्थगिती दिली आहे. २० वर्षांपूर्वी सदनिका लाटल्याच्या प्रकरणात कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता, आणि त्यासंदर्भातील खटला अद्याप न्यायप्रविष्ट आहे.
या प्रकरणात न्यायालयाने काही दिवसांपूर्वी त्यांना शिक्षा सुनावली होती. मात्र, कोकाटे (Manikrao Kokate) यांनी याविरोधात सत्र न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने त्यांच्या याचिकेची दखल घेत शिक्षेला तात्पुरती स्थगिती दिली आहे.
(हेही वाचा – MLA Residence : मंत्र्यांकडून आमदार निवासातील खोल्या अद्याप रिकाम्या नाहीच)
या निर्णयामुळे कोकाटे (Manikrao Kokate) यांना राजकीय आणि वैयक्तिक दोन्ही पातळीवर मोठा दिलासा मिळाला आहे. आता या प्रकरणाचा पुढील न्यायालयीन लढा कसा असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community