-
मुंबई प्रतिनिधी
राज्याचे कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवळ हे अन्न व औषध प्रशासन तसेच विशेष सहाय्यता मंत्री असून, ते मंत्रालयाच्या सुरक्षाविषयक नियमांचे सर्रास उल्लंघन करत आहेत. रोज ३० ते ४० लोकांना सोबत घेऊन ते मंत्रालयात प्रवेश करत असल्याने सुरक्षेवर मोठा परिणाम होत आहे. (Narhari Zirwal)
(हेही वाचा- Arvind Kejriwal यांनी यमुनेतील विषाचा पुरावा द्यावा; निवडणूक आयोगाकडून टीकेची गंभीर दखल)
मंत्रालयाच्या गेट क्रमांक १ हा मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी राखीव असतो. मात्र, मंत्री झिरवळ स्वतःच गेटवर थांबून आपल्या समवेत असलेल्या लोकांना नोंदणीशिवाय आत घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे प्रवेशद्वारावर गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे. विशेष म्हणजे, बॅगा स्कॅनरमध्ये न तपासताच लोकांना प्रवेश दिला जातो, ज्यामुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. (Narhari Zirwal)
आक्षेप घेणाऱ्या पोलिसांना धमकी!
सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांना मंत्री झिरवळ “बदली करू का?” अशी थेट धमकी देत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांवर दबाव टाकून अनधिकृत व्यक्तींना आत घेतले जात आहे. (Narhari Zirwal)
(हेही वाचा- SSC – HSC Exam : गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील त्या केंद्राची परीक्षा केंद्र मान्यता रद्द होणार)
नोंदणी एकाची, आत चार जण!
मंत्रालयाच्या नियमांनुसार, प्रत्येक अभ्यागताची स्वतंत्र नोंदणी आवश्यक आहे. मात्र, मंत्री महोदय एका व्यक्तीची नोंदणी करून त्याच्यासोबत आणखी तीन-चार जणांना आत घुसवतात. त्यामुळे खऱ्या अभ्यागतांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. (Narhari Zirwal)
सुरक्षेसाठी गंभीर धोका!
मंत्रालयात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास, नोंदणी न झालेल्या व्यक्तींची माहिती पोलिसांकडे उपलब्ध नसेल. हा सुरक्षेच्या दृष्टीने मोठा धोका असून, कायदे बनवणारेच कायद्याचे उल्लंघन करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. (Narhari Zirwal)
(हेही वाचा- युवासेनेतर्फे ९ फेब्रुवारीला Common Man Day साजरा होणार)
कर्मचाऱ्यांची सरकारकडे तक्रार
या प्रकारामुळे मंत्रालयातील नियमित कर्मचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सरकारने तातडीने याची दखल घेऊन संबंधित मंत्र्यावर कारवाई करावी, अशी मागणी कर्मचारी व सुरक्षारक्षकांकडून करण्यात येत आहे. (Narhari Zirwal)
हेही पहा-