गंगा नदीत घासून पुसून अंघोळ करणाऱ्यांमुळे नदी प्रदूषित झाली आहे. त्यामुळे त्या नदीचे पाणी नको, श्रद्धेला काही तरी अर्थ आहे कि नाही, अशा शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गंगा स्नानावर टीका केली होती. त्यावर आता चौफेर टीका होऊ लागली आहे. आता मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनीही राज ठाकरे यांना सडेतोड प्रश्न विचारला आहे.
(हेही वाचा भारताच्या विजयाचा धर्मांधांना पोटशूळ; Madhya Pradesh मध्ये दुकाने आणि वाहने पेटवली, पेट्रोल बॉम्बही फेकले)
नितेश राणे काय म्हणाले?
तो आमच्या आस्था आणि श्रद्धेचा विषय आहे. मी स्वतः माझ्या आईबरोबर महाकुंभला जाऊन आलो आहे, गंगा स्नान केले आहे. मला तर आजपर्यंत साधी खाजही आली नाही. ना माझ्यासोबत असलेल्या लोकांना कुठला त्रास झाला. मग त्यांना कुठले चार पाच लोक भेटले, हा विषय विचारायला पाहिजे ना? असे नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले. हाच मुद्दा, बकरी ईदच्या वेळेला जेव्हा बकरी कापून घाण पाणी सोडले जाते, तेव्हा कोण विचारत नाही. मोहम्मद अली रोडला जाऊन बघा, रात्री काय धिंगाणा केला जातो, सगळे खाऊन पिऊन घाण खाली टाकली जाते. तेव्हा कोण विचारत नाही, असेही मंत्री राणे (Nitesh Rane) म्हणाले.
Join Our WhatsApp Community