सागरी सुरक्षा व मत्स्योत्पादन वाढीसाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करणार Minister Nitesh Rane यांचे प्रतिपादन

37
मुंबई प्रतिनिधी: 

सागरी सुरक्षेसोबतच (Maritime security) राज्यातील मत्स्योत्पादन वाढीसाठी एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याची गरज असून, यासाठी राज्य सरकार विशेष पावले उचलणार आहे, असे मत मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले. (Minister Nitesh Rane)

सोमवार, २४ फेब्रुवारीला मंत्रालयात झालेल्या चर्चेत मंत्री राणे यांनी देशभरातील एआय तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, सागर किनाऱ्यांवरील घुसखोरी (Encroachment on sea shores) रोखणे, सागरी सुरक्षा मजबूत करणे आणि मत्स्योत्पादन (Fish production) वाढवणे ही सरकारची प्राथमिकता आहे. राज्याला ७२० किमी लांबीचा सागर किनारा लाभला आहे. यासाठी सध्या ड्रोनचा वापर केला जात असून, त्याचा डेटा एआयच्या मदतीने अधिक प्रभावीपणे वापरता येईल.

(हेही वाचा – Manik Kokate यांना तूर्तास दिलासा?)

विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना
विद्यार्थ्यांनी मुख पडताळणी (फेस रिकग्निशन), किनारा मॅपिंग, जीपीएस फेन्सिंग, तलावांचे मॅपिंग, मासेमारी क्षेत्राची माहिती देणारे मॉडेल आणि हवामान अंदाज देणारे तंत्रज्ञान विकसित करण्याच्या संकल्पना मांडल्या. यासाठी ‘जीवायएएन (GYAN)’ संस्थेच्या मदतीने एक परिपूर्ण कृती आराखडा तयार केला जाणार आहे.

(हेही वाचा – UNESCO : छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना UNESCO जागतिक वारसा दर्जा मिळणार!)

प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र योजना
मंत्री राणे यांनी स्पष्ट केले की, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मत्स्योत्पादनाच्या पद्धती वेगळ्या आहेत. त्यामुळे एकसंध योजना न राबवता, स्थानिक गरजांनुसार एआय तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाईल. यावेळी सहभागी विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशस्तीपत्र देण्यात आले. तसेच, राज्यात एक आधुनिक एआय आधारित मॉडेल विकसित करण्याच्या सूचनाही मंत्री राणे यांनी दिल्या.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.