आम्ही राज्यात एक सक्षम आणि मजबूत धर्मांतरविरोधी कायदा आणणार आहे, असे आश्वासन कॅबिनेट मंत्री नितेश राणेंनी (Nitesh Rane) दिले आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सोमवार, १६ डिसेंबर रोजी ते पहिल्यांदाच विधान भवनात दाखल झाले. यावेळी माध्यमांशी संवाद साधत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. (Nitesh Rane)
मंत्री नितेश राणे म्हणाले की, “लव्ह जिहादसंदर्भात (Law of Love Jihad) यापुढेही असेच काम सुरु राहणार असून धर्मांतर विरोधी कायदा (Anti-Conversion Act) आम्ही आमच्या जाहीरनाम्यात दिलेला आहे. भाजपाने आजपर्यंत जाहीरनाम्यात दिलेला शब्द पूर्ण केलेला आहे. आम्ही राज्यात एक सक्षम आणि मजबूत धर्मांतरविरोधी कायदा आणणार, असा शब्द आम्ही जाहीरनाम्यात दिला असून योग्य पद्धतीने अभ्यास करून तो कायदा आम्ही आणू,” असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, “मंत्री म्हणून पहिल्यांदाच विधिमंडळात पाऊल टाकले आहे. माझ्या पक्षाचे नेतृत्व, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व वरिष्ठ नेत्यांनी आमच्यासारख्या तरूण हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर फार मोठी जबाबदारी टाकलेली आहे. महाराष्ट्र, कोकण, हिंदू समाज या सगळ्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी, त्यांना ताकद देण्यासाठी आणि संरक्षण करण्यासाठी मी जास्तीत जास्त माझ्या पदाच्या माध्यमातून प्रयत्न करीन. माझ्या खांद्यावर टाकलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करेन,” असेही ते म्हणाले.
(हेही वाचा –Mumbai Crime : चायनीज मंचुरियन’ ग्राईंडर मध्ये अडकून कामगाराचा मृत्यू, मालकाविरुद्ध गुन्हा दाखल)
विरोधकांनी ईव्हीएमच्या विरोधात (EVM) केलेल्या आंदोलनाबद्दल बोलताना ते म्हणाले की, “विरोधकांनी हेच आंदोलन जर लोकसभेनंतर केले असते तर लोकांना त्यांच्यावर विश्वास बसला असता. वायनाडच्या कुठल्यातरी पायऱ्या शोधून तिथे बसून ईव्हीएमबद्दल बोलल्यास लोकांनी विश्वास ठेवला असता. पण आता हे हिंदुद्वेषाचे राजकारण (Politics of Hindu hatred) लोकांनादेखील माहिती आहे. जेव्हा वोट जिहाद झाला तेव्हा त्यांना काहीही वाटले नाही. तेव्हा ते हिरवा गुलाल उधळत होते. आता हिंदू समाजाने एकत्र येऊन हिंदुत्ववादी विचारांचे सरकार निवडले आणि हिंदु मतदार म्हणून आपली ताकद दाखवल्याने त्यांना हिरव्या मिरच्या लागत आहेत. त्यामुळे विरोधक जे काही करतात ते हिंदु समाज खुल्या डोळ्याने पाहतो आहे. ईव्हीएमच्या या आंदोलनाला काहीही अर्थ नाही,” असेही मंत्री नितेश राणे म्हणाले.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community