स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने देशावर सर्वाधिक काळ राज्य केले. परंतु, हा पक्ष एकाच कुटुंबाच्या भोवती घुटमळत राहिला. देशाचा ‘अमृतकाळ’ सुरू आहे परंतु, राहुल गांधी असेपर्यंत काँग्रेसचा ‘राहुकाल’ अर्थात अशुभ वेळ सुरू राहणार असल्याची टीका अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी राज्यसभेत केली.
अर्थमंत्र्यांचं काँग्रेसवर टीकास्त्र
देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असून भाजप सत्तेत आहे. यापार्श्वभूमीवर निर्मला सीतारामन यांनी देशात ‘अमृतकाळ’ सुरू असल्याचे सांगितले. यावर काँग्रेस सदस्यांनी सध्या राहुलकाल (अशुभ वेळ) सुरू असल्याची टिप्पणी केली. त्यानंतर निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. राहुल गांधी यांना त्यांनी काँग्रेसचा राहुकाल संबोधले. यावर संतप्त झालेल्या सीतारामन म्हणाल्या की, गरीबी ही एक मानसिक अवस्था आहे, या राहुल गांधी यांच्या जुन्या जाहीर वक्तव्याचा दाखला देऊन त्या म्हणाल्या की, ‘ही यांची गरीबांबाबतची मानसिकता आहे.
डिजिटल बजेटवर टीका करणाऱ्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावे
काँग्रेसचा राहुल काळ सुरू असल्यामुळेच तुम्ही 44 जागांवर आला आहात. हे चालूच राहणार आहे. राहुल गांधी 2013 मध्ये म्हणाले होते की गरीबी ही मानसिकता आहे. ती प्रत्यक्षात नसतेच. अन्नाची कमतरता, पैसा व भौतिक वस्तूंचीही कमतरता ही गरीबी नाहीच. एखाद्याकडे आत्मविश्वास असेल तर तो गरीबी दूर करू शकतो, असेही राहुल गांधी म्हणाले होते, त्याचा दाखला देऊन सीतारामन म्हणाल्या, की संबंधित काँग्रेस खासदारांचे नाव मी घेणार नाही, पण असे उद्गार कोणाचे आहेत-असतील हे साऱ्यांनाच माहिती आहे. यापुढील 25 वर्षांना ‘अमृतकाळ’ म्हणण्यास आम्हाला काहीही संकोच होत नाही. कारण आमचे प्रयत्न प्रामाणिक आहेत व एका विशिष्ट घराण्याचेच भले करण्याची धडपड आम्ही करत नाही, असे सांगून त्यांनी डिजिटल बजेट अशी टीका करणाऱ्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावे.
(हेही वाचा – पुण्यातील कोविड सेंटरचं कंत्राट मुंबईतील ‘त्या’ चहावाल्याला! सोमय्यांचा खळबळजनक दावा)
देशाचा महागाई रोखून धरण्यात भाजपला यश
पुढे त्या असेही म्हणाल्या की, आमच्याकडे देशाच्या शतकमहोत्सवासाठी काही योजना नसतील तर गेल्या 70 वर्षांत देशाचे जे हाल आर्थिक आघाडीवर झाले त्यांचीच पुनरावृत्ती होईल. गेल्या 70 वर्षांत सरकारांकडे एका घराण्याचे भले करण्याशिवाय काही व्हीजन होते की नाही अशी शंका यावी, अशी देशाची आर्थिक अवस्था आहे. कोरोनामुळे देशाच्या जीडीपीला 9 लाख 57 हजार कोटींचा फटका बसला. मात्र पुरवठ्याच्या आघाडीवर आलेल्या अडथळ्यांव्यतिरिक्तही देशाचा महागाई दर 6.2 टक्क्यांवर रोखून धरण्यात भाजप सरकारला यश आले आहे. यापुढील काळात ‘पीएम गती शक्ती मिशन’ मुळे पायाभूत सुविधांत समन्वय राहील व त्यांच्यावर होणाऱ्या खर्चात मोठी बचत होईल असे सीतारामन यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community