मंत्री विश्वजीत कदमांच्या ताफ्यातील वाहनाला भीषण अपघात

विश्वजीत कदम यांच्या दौऱ्याच्या वेळी त्यांच्या ताफ्याला अपघात झाला, त्यामध्ये पोलिस वाहनाचे नुकसान झाले, त्यात पोलिस हवालदार सुर्वे हे जखमी झाले आहेत.

राज्यमंत्री विश्वजीत कदम हे सांगली जिल्ह्याच्या पाहणी दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांच्या वाहनसोबत असलेल्या ताफ्यांत पोलिसांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची घटना मंगळवारी, २७ जुलै रोजी घडली. त्यामध्ये पोलिसांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले. त्यामध्ये मंत्री विश्वजीत कदम हे सुखरूप आहेत.

पोलिस हवालदार सुर्वे जखमी!

राज्यमंत्री विश्वजीत कदम हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. ते त्यावेळी पलुस तालुक्यातील नागठाणे येथील पूरग्रस्तांच्या पाहणीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या ताफ्यासोबत असलेल्या पोलिस एस्कॉर्ट वाहनाला एक मोटर सायकल आडवी आली. मोटार सायकलला वाचवत असताना पोलिस वाहन चिखलात स्लीप होऊन खांबास धडकले. गाडी धडकल्यानंतर ती गाडी जागेवरच पलटी झाली. या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले असून गाडीतील पोलिस हवालदार सुर्वे हे जखमी झाले आहेत. विश्वजीत कदम यांनी तातडीने स्वतःच्या गाडीतून हवालदार सुर्वे यांना आष्टा येथील स्पंदन हॉस्पिटलमध्ये दाखल करून कदम पुढील दौऱ्यासाठी गेले. या अपघातात चालक आणि पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. सांगली जिल्ह्याला यंदा पुराचा जबर फटका बसला आहे. या भागात कृष्णा नदीची पातळी ५९ फुटापर्यंत वाढली होती. त्यामुळे या भागातील नागरिकांचे किती जीवित आणि वित्तहानी झाली याची पाहणी करण्यासाठी विश्वजीत कदम हे सांगली दौऱ्यावर आले होते.

(हेही वाचा : भास्करराव आजवर किती वेळा चुकले? वाचा…)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here