शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर मंत्री Sanjay Shirsat यांचा मोठा खुलासा; म्हणाले, लाडक्या बहिणींमुळे…

99
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर मंत्री Sanjay Shirsat यांचा मोठा खुलासा; म्हणाले, लाडक्या बहिणींमुळे…
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर मंत्री Sanjay Shirsat यांचा मोठा खुलासा; म्हणाले, लाडक्या बहिणींमुळे…

Sanjay Shirsat : सध्या राज्याची आर्थिक परिस्थिती नाही. त्यामुळे या वर्षी पण आणि पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी शेतकऱ्यांना केले. दरम्यान लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) जाहीर झाल्यानंतर राज्याच्या तिजोरीवर भार आला असल्याचे विधान सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट (Social Justice Minister Sanjay Shirsat) यांनी केलं. तसेच ही योजना जाहीर झाल्यानंतर तिजोरीवर ४३ हजार कोटींचा भार आला आहे. त्यामुळे वाढलेला भार पाहता कर्जमाफीही होणार नाही, असंही यावेळी शिरसाट यांनी म्हटले आहे. (Sanjay Shirsat)

संजय शिरसाट काय म्हणाले?
अर्थसंकल्पावर आलेला भार ज्या प्रमाणात वाढलेला आहे, त्या अनुषंगाने कदाचित अजित पवार यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी (Farmers’ loan waiver) होणार नाही अशी घोषणा केली आहे. लाडकी बहीण योजना आम्ही जेव्हा जाहीर केली त्यावेळी त्याचा असलेला आर्थिक भार जवळपास ४३ हजार कोटींचा आहे. त्यामुळे विकासाची कामं असली तरी त्याची गती मंदावली आहे. म्हणून पुढच्या काळात महसूल कसा वाढेल याकडे सरकारचं लक्ष आहे. महसूल (revenue) वाढला तर या कामांना गती देता येईल. लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) ही कायम चालू ठेवायला मदत देखील करता येईल, असे संजय शिरसाट म्हणाले.

(हेही वाचा – Korigad Fort : कोरीगड किल्ला हा ट्रेकिंगसाठी त्रासदायक आहे का? कसे पोहोचाल या किल्ल्यावर?)

विधानसभा निवडणुकीनंतर (Assembly Elections) शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याची चर्चा राज्यात सुरु आहे. मात्र, अद्याप राज्य सरकारच्या वतीने तशी कोणतीच घोषणा करण्यात आलेली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात (Budget session) तरी शेतकऱ्यांना तसा दिलासा मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र अर्थसंकल्पात देखील शेतकरी कर्जमाफीचा उल्लेख करण्यात आला नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.