पर्यटकांच्या सुरक्षेसाठी मंत्री Shambhuraj Desai यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

51
मुंबई प्रतिनिधी

राज्य सरकारने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी (Tourist safety) मोठा निर्णय घेत सेवानिवृत्त पोलिसांना ‘पर्यटन पोलीस’ (Tourism Police) म्हणून कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई (Tourism Minister Shambhuraj Desai) यांनी बुधवारी यासंदर्भातील माहिती दिली. हा निर्णय काही वादग्रस्त ठरू शकतो, कारण कंत्राटी पद्धतीच्या नियुक्त्यांबाबत आधीच विरोध दर्शवला जात आहे. (Shambhuraj Desai)

‘पर्यटन पोलीस’ संकल्पना कशी असेल?

मंत्रालयात बुधवारी कराड तालुक्यातील पाल येथील ‘ब’ वर्ग देवस्थानाच्या विकास आणि ‘पर्यटन पोलीस’ संकल्पनेबाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना शंभूराज देसाई यांनी सांगितले की, पर्यटकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, तसेच राज्यातील संस्कृती, इतिहास, कायदे, नियम, आणि पर्यटन स्थळांबाबत योग्य माहिती मिळावी यासाठी पर्यटन स्थळांवर ‘पर्यटन पोलीस’ नेमण्यात येणार आहेत.

(हेही वाचा – बांगलादेशी विरुद्ध विशेष पथकाने १२ Bangladeshi Citizens घेतले ताब्यात; ८ जणांना अटक)

कोणता कर्मचारी वर्ग नेमला जाणार?

पर्यटन पोलीस पदासाठी सेवानिवृत्त पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बल आणि इतर संस्थांमधून कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत.

  • महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळांवर हे पोलीस तैनात असतील.
  • सुरुवातीला महाबळेश्वर येथे होणाऱ्या ‘महाराष्ट्र पर्यटन महोत्सवा’त प्रायोगिक तत्वावर ५० पर्यटन पोलिसांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
  • राज्य सुरक्षा मंडळ आणि मेस्को यांना त्यांच्या उपलब्ध कर्मचाऱ्यांची माहिती लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पर्यटन पोलीस फक्त सुरक्षेसाठीच नाही, तर पर्यटन स्थळांच्या शाश्वत जतनासाठी आणि व्यवस्थापनासाठीही मदत करतील, असा विश्वास शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.

पाल देवस्थानाचा पर्यटनदृष्ट्या विकास होणार

पाल हे ‘ब’ वर्गाचे देवस्थान (‘B’ class temple) असून येथे मोठ्या प्रमाणात भाविक आणि पर्यटक भेट देतात. त्यामुळे पर्यटकांसाठी सोयी-सुविधा वाढवणे आणि पर्यटनाच्या माध्यमातून देवस्थानाचा विकास करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने पाल देवस्थानाला पर्यटन स्थळ घोषित करण्यासंदर्भात सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाने सविस्तर प्रस्ताव तयार करून सादर करावा, असे निर्देशही देसाई यांनी दिले.

(हेही वाचा – Maharashtra News : मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळविणे होणार सोपे)

पर्यटन (Tourism) विभागाचा हा निर्णय पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणारा आणि पर्यटनस्थळांचा विकास करणारा ठरू शकतो. मात्र, कंत्राटी पोलीस (Contract police) नेमण्याच्या निर्णयाला काही संघटनांचा विरोध असू शकतो. तरीही, या उपक्रमामुळे पर्यटन स्थळे अधिक सुरक्षित आणि सुव्यवस्थित होतील, असा सरकारचा विश्वास आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.