सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्न पेटला आहे. या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची बैठक घेतली. त्यावेळी दोन्ही राज्यांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी दोन्ही राज्यांतील ६ मंत्र्यांची संयुक्त समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आता शुक्रवार, १६ डिसेंबर रोजी मंत्री शंभूराज देसाई कर्नाटकाच्या सीमेवरील शिनोळी गावाला भेट देणार आहेत.
सीमाभागातील नागरिकांच्या भावना जाणून घेणार
त्यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांची शिनोळी गावात सभाही होणार आहे. यानिमित्ताने ते सीमा भागातील गावांच्या नागरिकांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. सध्या सीमा भागात तणावाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत मंत्री शंभूराज देसाई हे कर्नाटकाच्या सीमेवर भेट देणार आहेत, ही महत्वाची बाब आहे. सध्या या गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री देसाई या गावात जाणार आहेत. काही दिवसांपूर्वी मंत्री शंभूराज देसाई हे सीमाभागाला भेट देणार होते, मात्र हे दौरा रद्द झाला होता.
(हेही वाचा आता FIFA Jihad : मुस्लिम देश मोरोक्काची फुटबॉल टीम हरल्यामुळे धर्मांध मुसलमानांकडून दंगल )
Join Our WhatsApp Community