‘राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ ही जाहिरात मंगळवारी सर्वच प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर झळकली आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. या जाहिरातीत एका सर्वेक्षणाचा दाखल देत राज्यातल्या जनतेने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांना अधिक पसंती दर्शवली आहे. तसेच आगामी निवडणुका शिंदे गटाच्या पाठिंब्याशिवाय भाजप जिंकू शकत नाही असा संदेशही देण्याचा जाहिरातीतून प्रयत्न केला आहे. शिवसेना, भाजप आणि आरपीआय जी महायुती आहे, ही यशस्वी होतेय, हे दाखवणारी ही जाहिरात असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
एका खासगी मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना उदय सामंत म्हणाले की, ‘या जाहिरातीचा अर्थ, ज्यांनी सर्वे केला त्या सर्वेतून नक्की असे निष्पण झाले आहे की, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री या दोघांच्याही नेतृत्वाखाली विकासात्मक काम ही महाराष्ट्रामध्ये येतायत आणि होतायत. त्याच्यामुळे भविष्याची निवडणूक देखील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली जिंकणार आहे, अशा दृष्टीने मी त्या जाहिरातीकडे वैयक्तिकरित्या बघतो.’
पुढे उदय सामंत म्हणाले की, ‘दरम्यान देवेंद्रजींनी पाच वर्षांचा कारभार हा अतिशय स्वयंम स्पष्ट आणि पारदर्शक केलेला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक प्रकल्प या महाराष्ट्रामध्ये उभे राहिले. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदेंनी विविध खात्यांचा कार्यभार बघितला होता. ११ महिन्यांच्या पूर्वी जी घडामोड घडली, त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, त्याच्यात पुढाकारही देवेंद्र फडणवीसांचा होता. त्याच्यामुळे महाराष्ट्राचेच नेते नाहीत, तर भाजपाच्या महाराष्ट्राच्या पूर्ण कार्यप्रणालीचे सर्वेसर्वा म्हणून आम्ही देवेंद्र फडणवीसांकडे बघतो. मी देखील मंत्रिमंडळात काम करत असताना अनेकदा देवेंद्र फडणवीसांचा सल्ला घेतो. त्याच्यामुळे असे कुठलेही वेगळे चित्र निर्माण करण्याची आवश्यकता नाही.’
(हेही वाचा – ‘राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ या जाहिरातीवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया; म्हणाले…)
‘ही जी जाहिरात आहे, ती शिवसेना, भाजप आणि आरपीआय जी महायुती आहे, ही यशस्वी होतेय, ही दाखवणारी जाहिरात आहे. नागरिकांना देवेंद्रजी आणि एकनाथजी यांच्यातील बॉडिंग माहित आहे, ते किती समंजस्य राजकारणी आहे, परिपक्व राजकारणी आहेत, त्याची महाराष्ट्राला अनेक वेळेला प्रचिती झाली आहे. हे उकरून काढण्याचे काम विरोधक करत असतात. आम्ही एकमताने, एक दिलाने, एक एकजुटीने, भाजप, शिवसेना आणि आरपीआय हे आम्ही निवडणुकीला सामोर जाऊ. आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालचे सरकार या महाराष्ट्रामध्ये येईल,’ असे स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community