दररोज मंत्रालयात हजारो लोक येत असतात. त्यांना मंत्रालयात प्रवेशासाठी पास (Ministry Entrance Pass) बंधनकारक आहे. तो मिळवण्यासाठी आणि त्यानंतर प्रवेशासाठी लोकांना दोन ते अडीच तास रांगेत ताटकळत राहावे लागते. तसेच सुरक्षा यंत्रणेवर ही ताण पडतो. मात्र नवीन वर्षात लोकांचा हा त्रास कमी होणार आहे. यासाठी शासनाकडून ‘डिजी प्रवेश’ (Digi access) नावाचे ॲप तयार करण्यात येत असून, महिनाभरात ही सुविधा सुरू होणार आहे. या ॲपच्या माध्यमातून लोकांना घरबसल्या मंत्रालयाचा प्रवेश पास काढता येणार आहे. (Ministry Entrance Pass)
सुरक्षा यंत्रणेवरही मोठा ताण
कॅबिनेट बैठकीच्या दिवशी मंत्रालयात येणाऱ्यांचा आकडा ५ हजारावर जातो. दुपारी दोननंतर मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी खिडकीवरून आधार कार्डच्या आधारे प्रवेश पास दिला जातो. त्यानंतर पोलिसांकडून तपासणी करून मंत्रालयातील गार्डन गेटमधून लोकांना प्रवेश दिला जातो. खिडकीवर पास काढण्यासाठी आणि मंत्रालयात आत जाण्यासाठी दोन्हीकडे साधारण एक ते दीड किमीपर्यंतची रांग लागलेली असते. सुरक्षा यंत्रणेवरही मोठा ताण पडत आहे. तो ॲपमुळे कमी होईल, असा अधिकाऱ्यांचा दावा आहे. (Ministry Entrance Pass)
असा मिळेल ॲपवरून पास
दरम्यान, १ जानेवारी २०२५ पासून मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रवेशासाठी एफआरएस प्रणाली (फेशियल रेकग्निशन सिस्टम) सुरू होत आहे. यासाठी मंत्रालयातील प्रत्येक गेटवर साधारण २९ ठिकाणरी फ्लॅप बॅरियर बसविण्यात आले आहेत. डीजी प्रवेश ॲपवर नोंदणीनंतर एक क्रमांक किंवा कोड मिळणार आहे. मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ हा कोड अथवा क्रमांक स्कॅन करावा लागणार आहे. त्यानंतर ओळखपत्र दिले जाईल. एफआरएस प्रणालीद्वारे त्या व्यक्तीची ओळख तपासली जाणार आहे. त्यानंतर त्याला प्रवेश दिला जाणार आहे. अशी माहिती मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली. (Ministry Entrance Pass)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community