- प्रतिनिधी
महायुती सरकारच्या स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून मंत्रिपदाच्या आशेवर असलेल्या आमदार मंत्रिपदाच्या अपेक्षेने मुंबईत सध्या मुंबईतच डेरा घालून आहेत. राज्यातील मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याच्या चर्चांमुळे अनेक आमदार मुंबईत आहेत आणि निवडून मतदारसंघात न थांबता मुंबईत तळ ठोकून आहेत.
काही आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून मंत्रिपदाच्या दाव्याची शक्यता व्यक्त करत आहेत. हे आमदार आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत आहेत आणि त्यांच्या पदोन्नतीसाठी लॉबिंग करत आहेत. (Ministry)
(हेही वाचा – Kurla Best Bus Accident : बेस्टमधील भाडे करार तत्त्वावरील बसेसचे पाप उबाठा सेनेचे)
राजकीय वर्तुळात या घडामोडींबद्दल उत्सुकता आहे, कारण मंत्रीपद वाट्याला येण्यासाठी अनेक नेत्यांना एकमेकांच्या स्पर्धेतील स्थिती समजून घेतली पाहिजे. त्यामुळे आगामी काही दिवसांत मंत्रिमंडळातील नावाची अधिक स्पष्टता होईल, अशी अपेक्षा आहे.
मंत्री पदासाठी इच्छूक असलेल्या नेत्यांनी आपले संपर्क प्रस्थापित केले असून, विविध पक्ष आणि गटांच्या वतीने या बदलांवर राजकीय दबाव तयार करण्यात येत आहे. काही नेत्यांनी आपल्या वरिष्ठ पातळीवर मंत्रीपद मिळविण्याच्या दृष्टीने जोरदार लॉबिंग सुरु केले आहे. (Ministry)
(हेही वाचा – Durgadi Fort : हिंदूंच्या प्रदीर्घ लढ्याला यश; कल्याणमधील दुर्गाडी हे देवीचे मंदिरच; न्यायालयाचा निर्वाळा)
नव्यांना मिळणार संधी ?
मुंबईत घडणार्या या सर्व घटनांवर सतत लक्ष राहावे आणि वेळी यावेळी बड्या नेत्यांच्या रात्री अप रात्री यासाठी इच्छुक आमदार मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत. त्यातच जुन्या मंत्र्यांना बदलून नव्यांना संधी देणार असल्याच्या वावड्या उठल्यामुळे अनेक आमदारांना आतापासूनच मंत्रिपदाचे स्वप्न पडू लागले आहे. त्यातील काही आमदार तर सहकुटुंब सहपरिवार मुंबईत थांबून आहेत. (Ministry)
(हेही वाचा – जर्मन Citizenship असूनही भारतात झाला चार वेळा आमदार; कोर्टातही लपवली माहिती)
मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ व १३ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता होती. मात्र, मंत्र्यांच्या नावांची निवड, तीनही नेत्यांची नावांवर चर्चा आणि मग केंद्रातून मंजुरी या प्रकियेला वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे १३ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चिन्हे धुसर होणार असल्याचे बोलले जात आहे. (Ministry)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community