रत्नागिरीत Love Jihad साठी आता अल्पवयीन मुसलमान मुलाचा वापर; धक्कादायक प्रकरण उघडीस

तेरा वर्षाच्या मुस्लिम मुलाने एका १७ वर्षाच्या हिंदू मुलीला इंस्टाग्रामवर हिंदू मुलाचे फेक अकाउंट काढून रिक्वेस्ट पाठवली. तिच्याशी हिंदू म्हणूनच बोलायचा. आपण एका राजकारणी कम बिजनेसमनचा मुलगा असून आपली डिझेल कंपनी असल्याचे सांगितले.

653

हर्ष यादव या हिंदू मुलाच्या नावाने इंस्टाग्रामवर फेक अकाउंट काढून पंजाब येथील हिंदू मुलीला मुस्लिम अल्पवयीन मुलाने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात (Love Jihad) ओढल्याची घटना रत्नागिरीत घडली. या प्रकरणी त्या फेक अकाउंटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामागे अल्पवयीन मुस्लिम मुलाचा लव्ह जिहाद साठी धर्मांध मुसलमान टोळक्याने वापर केला. पीडित मुलीला आपण फसवल्याचे पुढे आले आहे. यामागे नेमका सूत्रधार कोण याचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे. तेरा वर्षीय मुस्लिम मुलगा इंस्टाग्राम अकाउंट काढतो आणि हिंदू मुलीला फुस लावून पंजाब राज्यातील मोहाली इथून लग्नाच्या आमिषाने रत्नागिरीपर्यंत बोलावतो. ती मुलगी हिंदू असल्याने त्या हर्ष यादव नावाच्या तथाकथित हिंदू मुलाच्या प्रेमात पडते आणि आपल्या आई-वडिलांचे घरदार सोडून रत्नागिरीमध्ये येते. रत्नागिरीमध्ये रेल्वे स्टेशन परिसरात आल्यावर तिला खरी परिस्थिती कळते. प्रत्यक्षात हर्ष यादव नावाचा मुलगा ज्या मोबाईलवरून फोन आणि मेसेज करत असतो तो अस्तित्वातच नसतो, तर तो मोबाईल एका मुस्लिम मुलाचा असतो. त्या मुस्लिम मुलाचा आणि हर्ष यादवचा आवाज मात्र सारखा असतो. रत्नागिरीत आल्यावरती ती मुलगी हर्ष यादवच्या फोन वरती कॉल करते, त्यावर समोरून जो प्रतिसाद मिळतो तो मुस्लिम मुलाच्या घरातील असतो. तिला आपली फसवणूक झाल्याचे कळते. रेल्वे स्टेशन परिसरात पंजाबहुन इतक्या दूर ती एकटी पडते.

आपली फसवणूक झाल्याचे त्या तरुणीला समजल्यावर तिला परत घरी जाण्यासाठी मात्र पैशाची जुळवाजुळव करावी लागणार होती. आधीच त्या मुसलमान मुलाच्या सांगण्यावरून तिने फोनमधील सिम तोडून फेकून दिले होते. त्या मुलीने रत्नागिरीत आल्यावर त्या मुलाच्या नंबरवर कॉल करते. तेव्हा समोरून हिंदू मुलाचा आवाज ऐकू न येता एका मुस्लिम महिलेचा आवाज ऐकू येतो. ती मुस्लिम महिला सांगते की, हा नंबर तुला जो हवा त्या मुलाचा नाही. पुन्हा कॉल करू नकोस. ती महिला मुस्लिम असल्याचे कॉलवरून समजते आणि पंजाबहून आलेल्या हिंदू मुलीला आपण फसवले गेल्याचे लक्षात येते. त्यानंतर ती मुलगी रेल्वे स्टेशन परिसरानजीक असलेल्या एका मोबाईल शॉपीमध्ये काम मागायला जाते. चार दिवस काम करू जितके पैसे मिळतील ते घेऊ आणि आपल्या घरी परत जाऊ, या विचाराने ती जॉब शोधण्यास सुरुवात करते आणि एका मोबाईल शॉपीमध्ये येते. मोबाईल शॉपी मालक त्या मुलीला कुठून आली? इथे कशी आली? आणि त्या मुलीच्या वडिलांचा फोन नंबर घेऊन त्यांच्याशी संपर्क साधला. वडिलांना ती सुखरूप असल्याचे कळवले आणि तात्काळ त्या मुलीला रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथील पोलीस चौकीत पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पोलिसांनी पीडित हिंदू मुलीने दिलेल्या फिर्यादीनंतर एका तथाकथित हिंदू मुलावरती गुन्हा दाखल केला. (Love Jihad)  आणि अन्य एका अल्पवयीन मुस्लिम मुलाची चौकशी केली. त्यानंतर त्या अल्पवयीन मुलाने गुन्हा कबूल केल्याचेही पुढे आले. साधारण एक वर्ष तो तिच्याशी चॅटिंग करत होता. बाराव्या वर्षापासून जर तो चॅटिंग करतो तर इतक्या लहान वयात या मुलावर असले संस्कार करणारे तरी नेमके कोण? याचा शोध घेणे पोलिसांना गरजेचे आहे. आता पोलीस कोणत्या दिशेने तपास करतात हे येणाऱ्या काळात ठरेल. (Love Jihad)

(हेही वाचा बांगलादेशात इस्लामी राजवट आणा; Al Qaeda चे आवाहन)

अल्पवयीन मुलामागे नेमका सूत्रधार कोण?

तेरा वर्षाच्या मुस्लिम मुलाने एका १७ वर्षाच्या हिंदू मुलीला इंस्टाग्रामवर हिंदू मुलाचे फेक अकाउंट काढून रिक्वेस्ट पाठवली. तिच्याशी हिंदू म्हणूनच बोलायचा. आपण एका राजकारणी कम बिजनेसमनचा मुलगा असून आपली डिझेल कंपनी असल्याचे सांगितले. आपण कॉलेजमध्ये शिकत असून वडिलांच्या कंपनीमध्ये कॉलेज आटोपल्यानंतर काम करणार असल्याचे सांगितले. हे सगळे तेरा वर्षाच्या मुलाला कसे काय सुचते? मुलगी पंजाबमधून निघते त्यावेळी तिला तिकीट काढण्यासाठी लागणारे पैसे हे तिथल्या दुसऱ्या व्यक्तीच्या क्यूआरकोडवर पाठवून मुलीला कॅश देण्यास सांगणे, तिथून पुढे आल्यावर ती मोबाईलचे सिम कार्ड तोडून फेकून देण्यास सांगणे, फोन करायचा असल्यास दुसऱ्याच्या फोनवरून फोन करण्यास सांगणे हे ह्या अल्पवयीन मुलाला त्याच्या अल्पबुद्धीला कसे काय सुचू शकते? खरंतर हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. हे असे प्रश्न पडल्यावर ती यामागे दुसरा सूत्रधार तर कोणी नाही? ही शंका प्रत्येकाच्या मनात चुकचुकल्याशिवाय राहणार नाही. अर्थात पोलीस तपास करायला सक्षम आहेत त्यामुळे याचा पर्दाफाश ते नक्की करतील. (Love Jihad)

एक कॉल आणि हिंदू एकतेचा संदेश

पंजाबहून एक हिंदू मुलगी रत्नागिरीत आली आहे आणि तिची सोशल मीडियावर फसवणूक झाली आहे. ती एकटी असून तिला मदतीची गरज आहे. रत्नागिरीतील हिंदू बांधवांना समजले आणि हिंदू एकीचा प्रत्यय आला. समस्त हिंदू बांधव एकत्र येऊन तिच्या रक्षणासाठी आणि तिला लागणाऱ्या मदतीसाठी अगदी तिच्या राहण्या खाण्यापासून सगळी तजवीज करण्यापर्यंत धावत होते. जणू ती आपल्या घरातील एक बहीण असून सुखरूप असावी असा प्रत्येकाचा प्रयत्न होता. त्यासाठी हिंदू एकी पाहायला मिळाली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.