महिला आयोगाच्या अध्यक्षांसोबत गैरवर्तन! कार चालकाने मालीवाल यांना फरफटत नेले, आरोपीला अटक

दिल्ली येथील महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांना बुधवारी रात्री गैरवर्तनाला सामोरे जावे लागले. एका कार चालकाने बुधवारी रात्री मालीवाल यांना सुमारे 15 मीटर फरफटत नेल्याची दुर्दैवी घटना घडली. दरम्यान पोलिसांनी आरोपी कार चालकाला पहाटेच्या सुमाराला अटक करण्यात आली आहे. या प्रकारामुळे राजधानीतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून दिल्लीत रात्री घडलेल्या प्रकाराबद्दल महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

( हेही वाचा : शिंदे-फडणवीस सरकारच्या कामाचे कौतुक करणारी जाहिराती ‘सामना’त )

कार चालकाने मालीवाल यांना फरफटत नेले

यासंदर्भातील माहितीनुसार, बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली. स्वाती मालीवाल एम्सच्या गेट क्रमांक- 2 जवळ होत्या. यादरम्यान एका कार चालकाने त्यांना कारमध्ये बसण्यास सांगितले. स्वातीने कार चालकाला खडसावले असता त्याने तात्काळ गाडीची काच वर केली. यादरम्यान स्वाती यांचा हात कारमध्ये अडकला आणि चालकाने त्यांना सुमारे 15 मीटरपर्यंत फरफटत नेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीसीआरवर पहाटे 3.11 वाजता त्यांना कॉल आला की पांढऱ्या रंगाच्या बलेनो कारच्या चालकाने एका महिलेकडे चुकीचे हावभाव केले आणि तिला एम्स बस स्टॉपच्या मागे फरफटत नेले, परंतु ती महिला पळून जाण्यात यशस्वी झाली.

पोलिसांच्या पेट्रोलिक वाहनाला पहाटे 3 वाजेच्या सुमाराला एम्स गेट क्रमांक 2 समोर फूटपाथवर एक महिला दिसली. चौकशीत महिलेने सांगितले की, तिला कारमधून ओढले गेले. याबाबत पोलिसांना संबंधित बलेनो कार संदर्भात वायरलेसवर अलर्ट जारी केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी चालकास वाहनासह पहाटे 3 वाजून 34 मिनिटांनी ताब्यात घेतले. आरोपीचे नाव हरिश चंद्र (वय 47) असून तो दिल्लीच्या संगम विहारचा रहिवासी आहे. या कारवाईनंतर पोलिसांना कळले की, ज्या महिलेचा विनयभंग करण्यात आला त्या दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here