चूक झाली, माफ करा; नाशिकच्या सभेत Ajit Pawar यांनी दिली कबुली

167
चूक झाली, माफ करा; नाशिकच्या सभेत Ajit Pawar यांनी दिली कबुली
चूक झाली, माफ करा; नाशिकच्या सभेत Ajit Pawar यांनी दिली कबुली

आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या ठिकाणी सभा, चर्चासत्र घेण्यास सुरुवात केली आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (Nationalist Congress Party) अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेला (Jansanman Yatra) सुरुवात केली असून, शुक्रवारी (०९ ऑगस्ट) रोजी नाशिक निफाड (Nashik Niphad) येथील जनतेला संबोधित करताना, अनेक विषय मांडले. यामध्ये “लोकसभेला जो झटका दिला तो जोरात लागला, कंबर मोडली, आमची चूक झाली, माफ करा” जो काम करतो तोच चुकतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी शेतकऱ्यांसमोर चुकीची कबूल दिली आहे. (Ajit Pawar)

अजित पवार म्हणाले की,  “आज नागपंचमीचा सण आहे. नागांची आपण पूजा करतो. महिला झोका खेळतात, ही आपली संस्कृती आहे. आपला ठेवा आहे. शुक्रवारी आदिवासी दिन आहे. तसेच ऑगस्ट क्रांती दिन आहे, महात्मा गांधी यांनी चलेजावची घोषणा आजच्याच दिवशी केली. स्वातंत्र्य लढ्यात अनेकांनी बलिदान दिले. त्यांना विनम्र अभिवादन करतो. शुक्रवारी पावसाचा दिवस आहे. या पावसात सर्वजण स्वागत करत आहेत. फुलांची उधळण करत आहेत. आम्ही चांगली योजना आणली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला. इतरही मित्र पक्षांचे सहकार्य लाभले. आम्ही कुठल्याही योजना अभ्यास केल्याशिवाय आणत नाही. महिलांना ५० टक्के आरक्षण दिले. त्यांना सक्षम केल्याशिवाय पर्याय नाही, असे त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले. (Ajit Pawar)

(हेही वाचा –काँग्रेसची हुजरेगिरी करूनही उद्धव ठाकरेंना काहीच मिळाले नाही : Keshav Upadhye )

लोकसभेमध्ये जो झटका दिला, तो जोरात लागला

आम्ही अडीच वर्षे सत्तेत होतो, त्यानंतर सरकार पडले, कसे पडले सर्वांना माहिती आहे. आम्ही किती दिवस सांगायचे सत्तेत नाही, सत्तेत आलो म्हणून विकास कामासाठी निधी देता आला. मी कोणाला दुखवण्यासाठी निर्णय घेतला नाही. मी कामासाठी आलो आहे. आम्ही अभ्यास करणारी माणसे आहोत. हवेत गप्पा मारणारी नाही. केंद्र सरकार आमच्या विचारांचे आहे. कांदा निर्यात आता बंद करायची नाही. “लोकसभेमध्ये जो झटका दिला, तो जोरात लागला, कंबर मोडली, आमची चूक झाली, माफ करा. जो काम करतो तोच चुकतो”. कांदा निर्यात बंदी करायची नाही. वीज बिल माफ करा, असे निर्णय आता घेतले आहेत. 

(हेही वाचा – Navi Mumbai Airport ला दि. बा. पाटील यांचे नाव द्या; रविंद्र वायकरांनी लोकसभेत केली मागणी)

गुलाबी स्वप्न दाखवत नाही

मी आता दुसऱ्यावर टिकाच करणार नाही. माझ्याकडे सांगण्यासाठी खूप कामे आहेत. मी उगाच गुलाबी गाडीत फिरत नाही. गुलाबी स्वप्न दाखवत नाही. अजित दादाचा वादा आहे. स्वप्न पूर्ण करण्याची धमक आणि ताकद आहे. नाशिक जिल्हा बँक (Nashik District Bank) सुरळीत सुरू करणार आहे. बँक कोणी मातीत घातली हे तुम्हाला माहित आहे. त्यावर जास्त बोलणार नाही ज्यांनी मातीत घातली त्यांना निवडून देऊ नका, असे अजित पवारांनी म्हटले आहे.  (Ajit Pawar)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.