केंद्राने संमत केलेल्या वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात पश्चिम बंगाल (West Bengal) येथे जोरदार विरोध होऊ लागला आहे. येथे मुसलमान हिंसक बनले असून त्यांच्याकडून हिंदूंवर अत्याचार सुरु झाले आहेत. मात्र तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुसलमानांना हा हिंसाचार करण्यासाठी प्रोत्साहन देणे सुरु केले आहे. यावरून ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला.
वक्फ सुधारणा कायद्यावरून पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) हिंसाचार वाढतच आहे. हा कायदा पश्चिम बंगालमध्ये लागू होणार नाही, या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेल्या घोषणेनंतर राज्यात धर्मांध मुसलमानांचा उन्माद वाढला आहे. मुसलमान हिंदूंना लक्ष्य करत आहेत. या हल्ल्यांबाबत ज्येष्ठ अभिनेते आणि भाजपा नेते मिथुन चक्रवर्ती यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ममता बॅनर्जी राज्यात जातीय तेढ पसरवत असून बंगालमधील (West Bengal) हिंदूंसाठी ममता बॅनर्जी स्वतःच सर्वात मोठा धोका बनल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
(हेही वाचा सर्वोच्च न्यायालयाने Waqf Amendment Law वर आणली स्थगिती; कोणत्या तरतुदींवर न्यायालयाने घेतले आक्षेप?)
पश्चिम बंगालमधील (West Bengal) हिंदूंवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांबाबत पश्चिम बंगालमध्ये हिंदू बेघर झाले आहेत. त्यांना रिलीफ कॅम्पमध्ये राहावे लागत आहे. शेवटी त्यांचा काय दोष? मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपल्या राजकारणासाठी जातीय तेढ पसरवून दोन समुदायांमध्ये फूट पाडण्याचे काम करत आहेत. त्या मुद्दाम मुस्लीम समाजातील लोकांना गोंधळात टाकून भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. मिथून चक्रवर्ती यांनी वक्फ कायद्याच्या विरोधात केलेल्या विधानांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि भारतीय संसदेने मंजूर केलेला कायदा लागू न करण्याचा अधिकार ममता बॅनर्जींना कोणी दिला असा सवाल केला. त्या संविधानाहून वरचढ झाल्या आहेत का? त्यामुळे येत्या निवडणुकीत हिंदूंनी १०० टक्के मतदान केले नाही तर भविष्यात त्यांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागेल, असेही मिथुन चक्रवर्ती म्हणाले. (West Bengal)
Join Our WhatsApp Community