बांगलादेशी घुसखोरांविरोधात MLA Ameet Satam आक्रमक; मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली कडक कारवाईची मागणी

43
बांगलादेशी घुसखोरांविरोधात MLA Ameet Satam आक्रमक; मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली कडक कारवाईची मागणी
बांगलादेशी घुसखोरांविरोधात MLA Ameet Satam आक्रमक; मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली कडक कारवाईची मागणी

अंधेरी पश्चिमचे भाजपा आमदार अमित साटम (MLA Ameet Satam) यांनी पश्चिम बंगाल येथून सीमा ओलांडून मुंबई बेकायदेशीररित्या स्थायिक होणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांविरोधात (Bangladeshi infiltrators) चिंता व्यक्त केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून साटम यांनी कडक कारवाईची मागणी केली आहे. बांगलादेशी घुसखोर (Bangladeshi infiltrators) अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे आढळून आल्याचे सांगत साटम यांनी सैफ खान यांच्यावर अलीकडेच झालेल्या हल्ल्याचा दाखला दिला.

( हेही वाचा : अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणारे 18 हजार भारतीय मायदेशी परतणार; S. Jaishankar यांची माहिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) लिहलेल्या पत्रात भाजपा आमदार अमित साटम (MLA Ameet Satam) यांनी अनेक उपाययोजना सुचवल्या आहेत. त्यात बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांसाठी शहराच्या उपनगरांमध्ये तात्पुरते नजरकैद केंद्र उभारणे. प्रमुख शहरांमध्ये विशेष फास्ट-ट्रॅक न्यायालये स्थापन करून वेळबद्ध खटले चालवणे व निकालानंतर घुसखोरांना त्वरित देशाबाहेर पाठवणे. तसेच पासपोर्ट (भारतामध्ये प्रवेश) अधिनियम, १९५०, आणि परदेशी नागरिक अधिनियम, १९४६, मध्ये सुधारणा करून घुसखोरीसाठी कठोर शिक्षा व दंडाचे व्यवस्थापन करणे, अशा उपाययोजनांचा समावेश आहे.

त्याचबरोबर साटम यांनी सांगितले की, या उपाययोजना लागू केल्यास बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांमुळे (Bangladeshi infiltrators) होणारा धोका लक्षणीयरीत्या कमी होईल आणि मुंबई (Mumbai) तसेच महाराष्ट्राचे सुरक्षितता आणि स्थैर्य वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच शहरातील अनेक भागात बेकायदेशीररित्या बांगलादेशी घुसखोर (Bangladeshi infiltrators) वास्तव्य करत असून त्यांना अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर १० ते १५ दिवसात त्यांना जामीन मिळतो, ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो असेही साटम म्हणाले.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.