Governor appointed MLA : आचारसंहितेपूर्वीच महायुतीचे ७ नेते आमदार; शपथविधीची तयारी सुरू, निवडणुकीपूर्वी कोणाला लागली लॉटरी?

293
Governor appointed MLA : आचारसंहितेपूर्वीच महायुतीचे ७ नेते आमदार; शपथविधीची तयारी सुरू, निवडणुकीपूर्वी कोणाला लागली लॉटरी?
Governor appointed MLA : आचारसंहितेपूर्वीच महायुतीचे ७ नेते आमदार; शपथविधीची तयारी सुरू, निवडणुकीपूर्वी कोणाला लागली लॉटरी?

राज्य सरकारकडून राज्यपाल नियुक्त (Governor appointed MLA) 12 आमदारांपैकी 7 आमदारांची नावं राज्यपालांकडे पाठवण्यात आली आहे. तर पाच जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहे. भाजपाला (BJP) तीन, शिवसेना (Shiv Sena) आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला (Ajit Pawar NCP) प्रत्येकी दोन जागा देण्यात आल्या आहेत. (Governor appointed MLA)

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या शपथविधीची तयारीही सुरू असल्याची माहिती आहे. दुपारी 12 वाजता विधानभवनातील सेंट्रल हॉलला सात आमदारांचा शपथविधी होणार आहे. विधीमंडळतात उपसभापती निलम गोरे यांच्या उपस्थितीत शपथविधी पार पडणार आहे. सध्या विधीमंडळात शपथविधीची तयारी सुरू आहे. (Governor appointed MLA)

भाजपाकडून कोणाला संधी?
भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आणि वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या पोहरादेवी संस्थानचे बाबूसिंग महाराज राठोड यांना भाजपने संधी दिली आहे. (Governor appointed MLA)

शिंदेंच्या शिवसेनेकडून कोणाला संधी?
एकनाथ शिंदे यांच्याकडून हेमंत पाटील, मनीषा कायंदे यांना संधी देण्यात आली आहे. मनीषा कायंदे यांची नुकतीच टर्म संपली होती. आता त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. (Governor appointed MLA)

अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून कोणाला संधी?
अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांना आमदारकी देण्यात आली आहे. (Governor appointed MLA)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.