रवी राणांच्या विरोधात बच्चू कडूंची पोलिसांत तक्रार

198

अमरावती जिल्ह्यातील बडनेरचे आमदार रवी राणा आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. यातूनच रविवारी बच्चू कडू यांनी आमदार रवी राणांच्या विरोधात पोलिस तक्रार दाखल केली आहे. तसेच रवी राणा यांनी आपल्यावरील आरोप सिद्ध न केल्यास त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आव्हानही कडू यांनी राणांना दिले आहे.

बच्चू कडूंनी केली तक्रार दाखल

आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला आहे. यातूनच रवी राणा यांनी काही दिवसांपूर्वी आमदार बच्चू कडू खोके घेऊन गुवाहाटीला गेल्याचा आरोप केला होता. आमदार रवी राणा यांनी आपल्यावर लावलेले आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याने माझी बदनामी झाली असून त्याविरुद्ध आमदार बच्चू कडू यांनी राजापेठ पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

(हेही वाचाः मुंबई विमानतळावर 15 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त)

बच्चू कडूंचे आव्हान

आमदार रवी राणा यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून जर त्यांचे जवळ काही पुरावे असेल तर सिद्ध करावे असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. तसेच रवी राणा यांनी आरोप सिद्ध न केल्यास कायदेशीर कारवाईसाठी तयार रहावे असे आव्हान बच्चू कडू यांनी आमदार रवी राणांना दिले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.