सरकारमधील नाराज आमदार माझ्या संपर्कात, मी धमाका करणार! बच्चू कडूंचा शिंदे-फडणवीसांना थेट इशारा

162

आमदार रवी राणा यांनी अचलपूरचे आमदार ब्चचू कडू यांच्यावर केलेल्या आरोपानंतर आता वातावरण चांगलेच तापले आहे. कडू यांनी गुवाहटीत जाऊन करोडो रुपये लाटल्याचा आरोप रवी राणा यांनी केला होता. त्यावरुन आपली बदनामी होत असल्याचा आरोप करत कडू यांनी राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पण जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली नाही तर आपण धमाका करणार असल्याचा थेट इशारा बच्चू कडूंनी शिंदे-फडणवीसांना दिला आहे.

ठोस भूमिका घ्या नाहीतर…

बिनबुडाचे आरोप करुन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. सध्या राज्य सरकारमधले 7 ते 8 नाराज आमदार माझ्या संपर्कात असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. त्यामुळे 1 नोव्हेंबरपर्यंत रवी राणा यांनी पुरावे सादर केले नाहीत आणि मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणी ठोस भूमिका घेतली नाही तर आपण मोठा धमाका करणार असल्याचा इशारा आमदार बच्चू कडू यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

(हेही वाचाः फटाक्यांवरुन खोपकरांनी शिवसैनिकांना भरला दम! म्हणाले, ‘मी घुसून मारेन…’)

जनतेच्या मतांचा आदर व्हायला हवा

आमदार रवी राणा यांनी कोणाच्या भरवशावर आरोप केले आहेत हे समोर आले पाहिजे. घरातला माणूस जेव्हा आरोप करतो तेव्हा वाईट वाटतं. पक्षाशिवाय आणि पैशांशिवाय मी लोकांमधून निवडून आलो आहे. त्यामुळे त्यांच्या मतांचा आदर व्हायला हवा. त्यामुळे याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका घेणे गरजेचे असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.