आमदार बच्चू कडू यांचा अपघात; डोक्याला गंभीर मार

77

अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांचा मोठा अपघात झाला आहे. रस्ता ओलांडताना हा अपघात झाला आहे. त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. बच्चू कडू यांना एक दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. यात ते जखमी झाले असून त्यांना तत्काळ अमरावतीच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आमदार बच्चू कडू यांच्या डोक्याला आणि उजव्या पायाला मोठ्या प्रमाणात इजा झाल्याची माहिती आहे. त्यांच्या डोक्याला चार टाके पडले असल्याची माहिती डाॅक्टरांकडून देण्यात आली आहे. आज अमरावती शहरात सकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान रस्ता ओलांडताना एका दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. या दुचाकीच्या धडकेत बच्चू कडू रोडच्या दुभाजकांवर जोरदार आदळल्याने डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागला आहे.

( हेही वाचा: उद्योगपती गौतम अदानी भेटल्यावर राज ठाकरे थेट देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला )

याआधीही या आमदारांचा झाला अपघात

मागच्या 20 दिवसांत तीन आमदारांच्या कारला अपघात झाला आहे. भाजप आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे आणि शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या कारला अपघाता झाला. या अपघातात तिन्ही आमदार जखमी झाले. त्याआधी 14 ऑगस्ट 2022 रोजी शिवसंग्रामचे नेते तथा आमदार विनायक मेटे यांचे कार अपघातात निधन झाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.