‘त्यांना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती करा’, कदमांबाबत बोलताना जाधवांची जीभ घसरली

202

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या शिंदे गटातील नेत्यांवर उद्धव ठाकरे गटाकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. त्यासाठी अनेकदा आक्षेपार्ह भाषा देखील वापरण्यात येत आहे. शिंदे गटातील नेते रामदास कदम यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांची देखील अशीच जीभ घसरली आहे. रामदास कदम यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती करा. त्यांच्या तोंडून घाण बाहेर पडली, असे विधान रामदास कदम यांनी केले आहे.

रविवारी रत्नागिरीतील दापोली येथील सभेत रामदास कदम यांनी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यावर घणाघात केला. त्यावरुन भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर टीका करताना आक्षेपार्ह विधान केले.

कदमांना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाका

माझ्या वडिलांचे निधन झाल्यानंतर रामदास कदम,सुनील तटकरे,अनंत गिते आणि हसन मुश्रीफ आले. त्यांच्या मी सपत्निक पाया पडलो पण कदम त्याचा राजकारणाशी संबंध लावतील असे वाटले नव्हते. माझ्यापेक्षा मोठ्या असलेल्या माणसांना नमस्कार करणं हे आमचे संस्कार आहेत. त्यामुळे रामदास कदम यांना तत्काळ वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती केले पाहिजे, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.

कदमांच्या तोंडून घाण बाहेर पडली

रामदास कदम यांनी वापरलेली भाषा आजवर कोणीही वापरलेली नाही. हा विषय जसजसा महाराष्ट्रात जाईल तसा महाराष्ट्रातील महिला वर्ग रामदास कदम यांची जोड्याने पूजा करेल. मुंबईत एकूण 1 कोटी 30 लाख जनता राहते, त्यांच्यासाठी शौचालयाची व्यवस्था आहे. त्या शौचालयांमधून जेवढी घाण नाही तेवढी घाण रामदास कदमांच्या तोंडून बाहेर पडल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. त्यांच्या या आक्षेपार्ह विधानाचा सर्वच स्तरातून निषेध नोंदवण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.