‘मुख्यमंत्र्यांनी ठरवलं असतं तर शिवतीर्थावर आमचाच दसरा मेळावा झाला असता, पण…’, शिंदे गटाने केले स्पष्ट

100

शिवसेनेची परंपरा असलेला दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्कवर घेण्यासाठी अखेर ठाकरे गटाला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे सध्या ठाकरे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून या निर्णयामुळे खरी शिवसेना ही आपलीच असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पण आता यावरुनच शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी मोठे विधान केले आहे. जर मुख्यमंत्र्यांनी ठरवले असते तर हा मेळावा होऊ दिला नसता पण त्यांनी न्यायालयाचा आदर राखला. पण या मेळाव्याच्या तिप्पटीने आम्ही शिंदे गटाचा दसरा मेळावा घेणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.

तिप्पटीने मेळावा घेणार

दीपक केसरकर यांच्यावर कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्यानंतर त्यांनी रविवारी कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दसरा मेळाव्यातून आम्ही बाळासाहेबांचे विचार पुन्हा जागृत करणार आहोत. आम्हाला याबाबत राजकारण करायचे नाही. आम्ही शांततेत दसरा मेळावा घेणार आहोत. कोणालाही चिडवण्यासाठी हा दसरा मेळावा नसेल. दसरा हा विचारांचे सोने लुटण्याचा सण असतो. त्यामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या हिंदुत्ववादी विचारांशी आम्ही आजही प्रामाणिक आहोत, असे दीपक केसरकर यांनी यावेळी म्हटले.

(हेही वाचाः ‘उद्या त्यांचं सरकार आलं तर मी त्यांना गुरुमंत्र देईन’, फडणवीसांचं पवारांना प्रत्युत्तर)

मुख्यमंत्र्यांनी केला न्यायालयाचा आदर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर का ठरवले असता तर शिवतीर्थावर आमचाच दसरा मेळावा संपन्न झाला असता. पण मुख्यमंत्री शिंदे हे जनतेचे नेते आहेत त्यामुळे त्यांनी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आदर केला, असेही केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.