शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर सध्या आपल्या विधानांमुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. शरद पवार यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर त्यांच्यावर टीका होत असतानाच निलेश राणे यांनी देखील त्यांच्यावर प्रहार केला आहे. पण निलेश राणे यांच्या वक्तव्याचा शिवसैनिकांनी निषेध न केल्याने आता केसरकर यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
माझा अपमान झाल्यानंतरही एकाही शिवसैनिकाला त्याचा निषेध करावा असं वाटत नसेल तर मी आता बोलणार नाही, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
हा अॅटिट्यूड असेल तर…
उद्धव ठाकरे यांच्याबाबत भाजपच्या नेत्यांनी विधान करू नये, अशी भूमिका मी मांडली होती. ही भूमिका भाजपच्या नेत्यांना देखील मान्य आहे. पण तरीही उद्धव ठाकरे यांच्याबाबत इतकं प्रेम असेल तर केसरकर यांनी मातोश्रीवर भांडी घासायला जावं, अशा शब्दांत राणेंच्या मुलाने माझ्यावर टीका केली होती. हा माझा अपमान आहे. पण सिंधुदुर्गातील एकाही शिवसैनिकाला याचा निषेध करावंसं वाटलं नाही. त्यामुळे जर शिवसैनिकांचा जर हा अॅटिट्यूड असेल तर मी उद्धव ठाकरे यांना बोलणा-यांविषयी यापुढे काहीही बोलणार नाही, अशा शब्दांत दीपक केसरकर यांनी शिवसैनिकांचा समाचार घेतला आहे.
(हेही वाचाः ‘त्या’ वक्तव्यावर केसरकरांकडून शरद पवारांची जाहीर दिलगिरी, म्हणाले….)
उद्धव ठाकरे यांच्याबाबत भाजप नेत्यांनी बोलू नये असं सांगणं ही काही माझी एकट्याची जबाबदारी नाही. मी शिंदे गटाचा प्रवक्ता आहे, बाकी कोणाचाही नाही, असे सांगत केसरकर यांनी शिवसैनिकांवरची आपली नाराजी व्यक्त केली आहे.
Join Our WhatsApp Community