अजित पवारांसह समर्थक आमदारांनी शिवसेना-भाजपा युतीला पाठिंबा दिल्यामुळे शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीचीही दोन शकले झाली आहेत. ३१ आमदारांचा पाठिंबा मिळवत अजित पवारांनी शरद पवारांना मात दिली आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीमधील वातावरणाचा अंदाज घेऊन अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी अजित पवारांना आपले समर्थन जाहीर केले आहे. विशेष म्हणजे बुधवारी सकाळपासून ते शरद पवारांच्या सोबत दिसले होते.
देवेंद्र भुयार हे अजित पवार यांचे समर्थक मानले जात असले, तरी राष्ट्रवादीतील फुटीनंतर त्यांनी शरद पवारांना आपला पाठिंबा दिला होता. सिल्वर ओकवर जाऊन त्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. शिवाय बुधवारी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित शरद पवार यांच्या मेळाव्यालाही ते उपस्थित होते.
परंतु, बुधवारी सायंकाळी त्यांनी देवगिरी निवासस्थानी अजित पवार यांची भेट घेतल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. भुयार यांच्याप्रमाणे आणखी काही आमदार अजित पवारांना समर्थन देतात का, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरेल.
(हेही वाचा – Mumbai Municipal Corporation : आता भंगार विक्रेते महापालिकेच्या रडारवर)
‘स्वाभिमानी’ने केली होती हकालपट्टी
देवेंद्र भुयार हे ‘स्वाभिमानी’च्या उमेदवारीवर निवडून आले. परंतु, पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत ‘स्वाभिमानी’ने त्यांची हकालपट्टी केली होती. यानंतर त्यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दर्शविला होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community