जिल्हा परिषदेच्या सभेदरम्यान गट विकास अधिकाऱ्याच्या दिशेने माईक आणि पाण्याच्या बाटल्या भिरकावल्या. या प्रकरणात मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांना जिल्हा न्यायालयाने तीन महिने साधा कारावास आणि १५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे त्यांना जामीन मंजूर केला आहे.
न्यायालयात दोषारोपपत्र दाखल
देवेंद्र भुयार हे जिल्हा परिषदेचे सदस्य असतानाची ही घटना आहे. पाणीटंचाईच्या प्रश्नावर २८ मे २०१९ रोजी जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत वरूड तालुक्यातील पाणीटंचाई विषयी गटविकास अधिकारी सुभाष बोपटे माहिती देत होते. दरम्यान एका मुद्यावरून भुयार आणि बोपटे यांच्यात चकमक उडाली. यावर संतप्त होत भुयार यांनी बोपटे यांच्या दिशेने माईक आणि पाण्याच्या बाटल्या भिरकावल्या. या प्रकारानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या तक्रारीच्या आधारे देवेंद्र भुयार यांच्या विरोधात गाडगेनगर पोलीस ठाण्यात भादंवि ३५३, १८६ व ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
(हेही वाचा छोट्या पक्षांनी कोंडी केल्याने शिवसेनेची दमछाक; पवार, महाडिकांचे भवितव्य अपक्षांच्या हाती)
Join Our WhatsApp Community