हिवाळी अधिवेशनापूर्वी विधानसभेत विरोधकांना विरोधी पक्षनेते पद मिळावे, यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोर लावला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्याकडे या संदर्भातील मागणी करणारा प्रस्ताव रविवारी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सादर केला. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडीनंतर त्यावर निर्णय होणार असून विरोधी पक्ष पद मिळेल, असा आशावाद आघाडीचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
(हेही वाचा – Mahakumbh 2025 : महाकुंभमध्ये आजारी पडणाऱ्या अन्य राज्यातील आणि परदेशी नागरिकांशी एआयच्या मदतीने होणार संभाषण)
विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला. आघाडीला केवळ ४६ जागा जिंकता आल्या. सर्वाधिक २० जागा शिवसेनेला (UBT) मिळाल्या. तर कॉंग्रेस १६ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने (शरद पवार) १० जिंकल्या. दुसरीकडे महायुतीने सर्वाधिक २३४ जागांवर विजय मिळवला. अशातच संख्या बळामुळे आघाडीतील घटक पक्षाला विरोधी पक्षनेते पद सुद्धा राखता आलेले नाही. राज्याच्या इतिसाहात प्रथमच विधानसभेतून विरोधी पक्षनेते पद हद्दपार झाले आहे. विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढवल्या. त्यामुळे आघाडी म्हणून विरोधी पक्ष नेते पद मिळावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना (UBT) आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन दिला. यासंदर्भातील प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना यावेळी देण्यात आला आहे. विरोधी पक्षनेते पद मिळावे यासाठी आघाडी एकत्रित मिळून प्रयत्न करत आहे. विधानसभा अध्यक्ष निवडल्यानंतर आम्हाला विरोधी पक्षनेते पद देण्याबाबत विचार होणार आहे. विरोधी पक्षनेते पद आम्हाला मिळेल, असा विश्वास शिवसेना (UBT) विधिमंडळाचे गटनेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी व्यक्त केला.
(हेही वाचा – जम्मूत Rohingya आणि बांगलादेशी घुसखोरांची वीज, पाणी कनेक्शन तोडले; ओमर अब्दुल्ला सरकार झाले नाराज)
नियमांत तरतूद नसल्याने दावा
विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी एका पक्षाचे किमान १० टक्के आमदार निवडून यावे लागतात, अशी तरतुद नियमात नाही, अशी माहिती आहे. १० टक्के सदस्य संख्येचे दाव्यानुसार २८८ संख्याबळ असलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी एका पक्षाकडे किमान २९ आमदारांचे संख्याबळ आवश्यक आहे. मात्र आघाडीतील एकाही पक्षाकडे तेवढे संख्याबळ नाही. विधानसभेत त्यामुळे विरोधी पक्षनेता नसेल, अशी स्थिती असेल. त्यामुळे शिवसेनेने (UBT) यासंदर्भात नियम आणि कायद्यातील तरतुदींची खात्री करून घेण्यासाठी विधिमंडळाच्या सचिवांना देखील पत्र देण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community