आमदार Dilip Lande यांच्यातर्फे श्रावण महिन्यात भव्य कावड यात्रेचे आयोजन

72
आमदार Dilip Lande यांच्यातर्फे श्रावण महिन्यात भव्य कावड यात्रेचे आयोजन
आमदार Dilip Lande यांच्यातर्फे श्रावण महिन्यात भव्य कावड यात्रेचे आयोजन

शिवसेना चांदिवली विधानसभा विभागाच्या वतीने, आमदार दिलीप (मामा) लांडे (Dilip Lande) यांच्या नेतृत्वाखाली, हिंदू संस्कृती व परंपरा जोपासण्यासाठी भगवान शंकराच्या जयघोषात व भगव्या वातावरणात हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या डी.जे.च्या गाण्याच्या तालावर अन् फटाक्यांच्या अतिषबाजीत रविवार दिनांक १८ ऑगस्ट रोजी शितल तलाव ते काजूपाडा पाईप लाईन मार्गे श्री शंभो महादेव मंदिर पर्यंत भव्य कावड यात्रा (Kavad Yatra) आयोजित करण्यात आली होती. (Dilip Lande)

श्रावण महिन्यात सालाबाद प्रमाणे या वर्षी आमदार दिलीप लांडे यांच्या माध्यमातून कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. याला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या कावडयात्रेत हजारो उत्तर भारतीय महिला भगवी साडी परिधान करून श्री शंभो महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करण्यासाठी घागर/कलश घेऊन सहभागी झाल्या तसेच शेकडो पुरुष हे भगवे कुर्ते परिधान करून कावड घेऊन आले होते.

(हेही वाचा – सहानुभूतीतून मिळालेली लोकप्रियता फार काळ टिकत नाही; रत्नाकर महाजनांचा Uddhav Thackeray यांना टोला)

या कावडयात्रे दरम्यान हिंदू देव-देवतांचे भगवान शंकर, श्रीराम, हनुमान आदी मुर्त्यासह चलतचित्र देखावा प्रदर्शित करण्यात आले. या कावडयात्रेसाठी खास तीर्थक्षेत्र काशी वरून पवित्र जल आणून श्री शंभो महादेव महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करण्यात आला. भगवी ताकद, भगवी शक्ती व भक्ती एकत्रित करून भगवी ताकद महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या पाठीशी पर्यायाने महाराष्ट्रात असलेले हिंदुत्ववादी शिवसेना भाजपा सरकारच्या पाठीशी उभी करण्याच्या दृष्टीने कावडयात्रेचे आयोजन करण्यात आले असे प्रतिपादन आमदार, विभागप्रमुख दिलीप लांडे यांनी केले.

भगवान श्री शंभो महादेवाच्या पिंडीवर तीर्थक्षेत्र काशीच्या जलाने अभिषेक करून चांदिवलीचा विकास करण्यासाठी ताकद मिळो अशी प्रार्थना करण्यात आली. या कावडयात्रेत उत्तर भारतीय महिलां मोठ्या प्रमाणावर सहभागी होत्या. यावेळी माजी नगरसेविका शैला लांडे, युवासैनिक प्रणव लांडे, प्रयाग लांडे, उत्तर भारतीय संघ चांदिवलीचे पदाधिकारी अध्यक्ष रामप्रसिद्ध दुबे, सेक्रेटरी भास्कर सिंह, महिला तालुका अध्यक्ष सरिता मिश्रा आदीसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Dilip Lande)

हेही पाहा –

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.