संविधानाच्या पदावरील व्यक्तींचा अवमानकारक उल्लेख यावेळी करण्यात आला. राज्यपाल फालतू माणूस असे म्हटले. संविधानिक संस्थांना शिवीगाळ करण्यात आली, हे दुर्दैवी आणि लोकशाहीला घातक आहे. ज्यांचा संविधानिक संस्थांवर विश्वास नाही त्याचा संविधानावर कसा विश्वास असणार? अशा शब्दांत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेवर हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्रमाला पत्रकार परिषद म्हणावे कि दसरा मेळावा अथवा गल्ली बोळातील भाषण, हेच कळत नाही. या कार्यक्रमातून मला अपेक्षित होते कि, माझ्याकडून काही चुकीचा निर्णय देण्यात आला का, हे सांगितले जाईल, परंतु राजकीय भाषणापलीकडे दुसरे काहीच झाले नाही, असा टोला हाणला. MLA Disqulification Case
सर्वोच्च न्यायालयाचा आदेशाचे पालन केले
सर्वोच्च न्यायालयाने भरत गोगावले किंवा अजय चौधरी यांची कुणाची निवड योग्य की अयोग्य, हे कधीच म्हटले नाही, मुळ राजकीय पक्ष आणि व्हीपला मान्यता देण्यात आली नाही. मुळ राजकीय पक्ष कोणता हे ठरविण्यास न्यायालयाने मलाच सांगितले. राहुल नार्वेकर म्हणाले की, अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन निर्णय घेतला, असे सातत्याने सांगण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने विपरीत निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. उपाध्यक्षांनी 21 जून 2022 रोजी अजय चौधरी यांच्या निवडीला दिलेली मान्यता योग्य आहे आणि मी 3 जुलै 2022 ला गोगावले आणि शिंदेच्या नियुक्तीला दिलेली मान्यता योग्य असल्याचे सांगण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश वाचला तर नेमके काय म्हटले आहे, हे स्पष्ट होईल.मूळ पक्ष कोणता हे तपासण्यासाठी मला तीन निकष ठरवण्यात आले होते. पक्षाची घटना, पक्षाची संरचना या बाबीचा सामावेश होता, असे राहुल नार्वेकर म्हणाले. MLA Disqulification Case
सुधारित घटना दिली नाही
राहुल नार्वेकर पुढे बोलताना म्हणाले की, मी निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते आणि त्यात स्पष्टता आणावी यासाठी पत्र लिहिले होते. त्यावेळीं त्यांनी मला काही कागदपत्रे दिली त्यामध्ये त्यांनी 22 जून 2023 ला उत्तर दिले की, 1999ची घटना माझ्याकडे पाठवली आणि ही योग्य असल्याचे सांगितले. मी त्यांना शिवसेनेची घटना सुधारित आहे का याबाबत देखील विचारले, त्यावेळी त्यांनी मला सांगितले की 2018 रोजीची अपडेट केलेली घटना रेकॉर्डवर नाही. त्यांनी म्हटले की आम्ही इलेक्शन कमीशनकडे सुधारित प्रत दिली, पण हे साफ खोटे आहे, असेही राहुल नार्वेकर म्हणाले.
Join Our WhatsApp Community