शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकांवरील सुनावणी विधानभवन इमारतीत सुरु झाली असून खटल्याशी संबंधित शिवसेनेचे (शिंदे गट) केवळ ३-४ आमदार हजर होते तर उबाठा गटाच्या २ आमदारांनी हजेरी लावली. तर ११ वकील यावेळी उपस्थित होते. (MLA Disqualification Case)
‘जय श्री राम’च्या घोषणा
निकालपत्राचे वाचन विधान भवनमधील सेंट्रल हॉलमध्ये सायंकाळी ५.११ वाजता सुरु झाले जे ४.३० वाजता सुरु होणे अपेक्षित होते. विधानसभा अध्यक्ष सभागृहात येताच ‘जय श्री राम’च्या घोषणाही ऐकू आल्या. (MLA Disqualification Case)
(हेही वाचा – Vibrant Gujarat 2024 : देश-विदेशातील कंपन्या करणार गुजरातमध्ये गुंतवणूक)
मंत्री उपस्थित, आमदार गैरहजर
दरम्यान शिवसेना दोन्ही गटाच्या आमदारांमध्ये निकालाबाबत उत्सुकता असली तरी उपस्थिती अत्यंत कमी दिसली. शिवसेना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यासह मंत्री दीपक केसरकर, उदय सामंत, तसेच आमदार भरत गोगावले, संजय शिरसाट, मंगेश कुडाळकर, बालाजी किणीकर, यमिनी जाधव, ज्ञानराज चौगुले यांनी हजेरी लावली. (MLA Disqualification Case)
वकिलांची फौज
उबाठा गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सुनील प्रभू, विधान परिषद आमदार सुनील शिंदे याशिवाय ठराविक अधिकारी आणि दोन्ही गटांच्या वकिलांची फौज यावेळी उपस्थित होती. (MLA Disqualification Case)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community