सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अल्टिमेटममुळे विधानसभा अध्यक्षांनी आता आमदार अपात्रतेच्या (MLA Disqualification Case) मुद्यावर सुनावणी सुरु केली आहे. मात्र या सुनावणीच्या शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांवर वैयक्तिक टीका टिप्पणी करून वाद घालत असल्यामुळे वेळ वाया जात आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपण १८ दिवसांतच ही सुनावणी आटोपणार आहे, असे सांगत सुनावणीच्या तारखाच जाहीर केल्या.
१८ दिवसांचा वेळ पुरणार का?
आमदार अपात्रता (MLA Disqualification Case प्रकरणात २८ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर आणि ११ डिसेंबर ते २२ डिसेंबर या काळात सार्वजनिक सुट्ट्या वगळता इतर दिवशी नियमित सुनावणी घेणार असल्याचे राहुल नार्वेकरांकडून घोषित करण्यात आले. पुढील महिन्यात नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन असले तरी अधिवेशन काळातही वेळ मिळेल तसे या प्रकरणातील सुनावणी घेण्यात येणार आहे. शिवसेनेतील फुटीनंतर विधानसभा अध्यक्षांकडे विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. हे सर्व प्रकरण कायदेशीरदृष्ट्या अत्यंत क्लिष्ट असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच मागील तीन दिवसांत केवळ व्हिपच्या मुद्द्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलटतपासणी केली जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाच्या सुनावणीसाठी १८ दिवस पुरेसे आहेत का, याबाबतही शंका उपस्थित केली जात आहे.
(हेही वाचा MLA Disqualification Case : सुनील प्रभूंनी व्हीप पाठवलाच नव्हता; महेश जेठमलानींचा थेट आरोप )
Join Our WhatsApp Community