MLA Disqualification Case : आमदार अपात्रता याचिका 31 डिसेंबरपर्यंत निकाली निघणे अशक्य; विधानसभा अध्यक्ष काय भूमिका घेणार ?

MLA Disqualification Case : या प्रकरणी सध्या नियमित सुनावणी चालू असली, तरी विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 7 ते 20 डिसेंबर या काळात होणार आहे. त्यामुळे दिलेल्या मुदतीत निकाल देणे कठीण आहे.

138
MLA Disqualification Case : आमदार अपात्रता याचिका 31 डिसेंबरपर्यंत निकाली निघणे अशक्य; विधानसभा अध्यक्ष काय भूमिका घेणार ?
MLA Disqualification Case : आमदार अपात्रता याचिका 31 डिसेंबरपर्यंत निकाली निघणे अशक्य; विधानसभा अध्यक्ष काय भूमिका घेणार ?

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या 16 आमदार अपात्रता प्रकरणाची (MLA Disqualification Case) नियमित सुनावणी विधीमंडळात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाने 31 डिसेंबरपर्यंत आमदार अपात्रतेप्रकरणी निर्णय घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना (Assembly Speaker) दिले आहेत. या प्रकरणी सध्या नियमित सुनावणी चालू असली, तरी विधानसभेचे हिवाळी अधिवेशन (Winter Session of Legislative Assembly) 7 ते 20 डिसेंबर या काळात होणार आहे. त्यामुळे दिलेल्या मुदतीत निकाल देणे कठीण असून, यासाठी वेळ वाढवून द्यावा, अशी विनंती महाराष्ट्र सरकार करणार का, अशी विचारणा होत आहे.

(हेही वाचा – Future of Virat, Rohit : विराट कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करणार, रोहित शर्माची उपलब्धता अजून अनिश्चित)

नागपूरातही सुनावणी घेण्याचे संकेत

दरम्यान, राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दोन्ही गटाच्या वकिलांशी चर्चा केली असून अधिवेशन काळातही सुनावणी घेऊ. वेळ पडल्यास 21 व 22 डिसेंबर रोजी नागपूरातही सुनावणी घेण्याचे संकेत विधानसभा अध्यक्षांनी दिले आहेत.

हिवाळी अधिवेशनाचा परिणाम होणार ?

महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. एकीकडे आमदार अपात्रता प्रकरणाची (MLA Disqualification Case) नियमित सुनावणी होत असताना दुसरीकडे विधिमंडळाचे कामकाज असणार आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासाठी मुदतीत सुनावणी घेऊन निर्णय घेणे कठीण असल्याचे बोलले जात आहे.

विधिमंडळाचे दैनंदिन कामकाज आटोपल्यानंतर सायंकाळी आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी (MLA Disqualification Case) घेतली जाऊ शकते, असे देखील काही जण सांगत आहेत.

(हेही वाचा – Cylinder Blast : चेंबूर मध्ये सिलिंडरच्या स्फोटाने घर कोसळलं; चार जण जखमी)

याचिकेची सद्यस्थिती काय ?

या प्रकरणी निकालासाठी 20 दिवसांचा कालावधी लागेल. आताच्या घडीला सुनील प्रभु यांची साक्ष नोंदवली जात आहे. यानंतर सचिव विजय जोशी यांची साक्ष नोंदवली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यापासून शिंदे गटाच्या नेत्यांची उलट साक्ष घेतली जाणार आहे. यामध्ये भरत गोगावले, दीपक केसरकर, उदय सामंत, योगेश कदम, दिलीप लांडे आणि राहुल शेवाळे यांचा समावेश असल्याचे समजते. (MLA Disqualification Case)

..म्हणून मुदतवाढीची मागणी

1 ते 11 डिसेंबरपर्यंत ठाकरे गटाचे वकील उलट साक्ष घेणार आहेत. सर्वसामान्यपणे साक्ष संपल्यावर निकाल देण्यास 20 ते 25 दिवसाचा कालावधी लागू शकतो. एकंदर परिस्थिती पाहता विधानसभा अध्यक्षांकडून सर्वोच्च न्यायालयाकडे वेळ वाढवून मागण्याची विनंती केली जाऊ शकते.

(हेही वाचा – Future of Virat, Rohit : विराट कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करणार, रोहित शर्माची उपलब्धता अजून अनिश्चित)

आमदार अपात्रता प्रकरणात (Winter Session of Legislative Assembly) दिरंगाई होत असल्याचा आरोप ठाकरे गटाने वारंवार केला आहे. ठाकरे गटाचे आमदार आणि प्रतोद सुनील प्रभु यांची साक्ष नोंदवली जात आहे. यामध्ये शिंदे गटाच्या वकिलांकडून अनेक प्रकारचे प्रश्न प्रभू यांना विचारले जात आहे. तर 21 जून 2022 या ठराव कधी झालाच नव्हता, हा शिंदे गटाच्या वकिलांचा दावा सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी फेटाळला आहे. (MLA Disqualification Case)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.