शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणी सुनावणी चालू आहे. (MLA Disqualification Case) उबाठा गटाच्या आमदारांची उलटतपासणी पूर्ण झाली आहे. आता नागपुरात (Nagpur) शिंदे गटाच्या आमदारांची उलटतपासणी सुरु झाली आहे. ८ डिसेंबर रोजी शिंदे (Eknath Shinde) गटाचे आमदार दिलीप लांडे (Dilip Lande) यांची आज साक्ष घेण्यात आली. उलटतपासणीत लांडे यांनी अनेक प्रश्नांना ‘आठवत नाही’ अशी उत्तरे दिली.
(हेही वाचा – Pune: पादचारीदिनानिमित्त पुण्यातील ‘हा’ रस्ता वाहतूक आणि पार्किंगसाठी बंद)
सुनील प्रभु यांनी बजावलेला व्हीप मिळाला नाही
‘शिवसेनेचे सुनील प्रभु (Sunil Prabhu) यांनी व्हीप बजावलेला; परंतु तो आपल्याला मिळाला नाही’, असे लांडे यांनी सांगितले. देवदत्त कामत यांनी एक ईमेल आयडी दाखवताच तो आपलाच असल्याचे आमदार दिलीप लांडे (Dilip Lande) यांनी कबुल केले. आमदार दिलीप लांडे यांनी ‘भावाने आपल्याला सांगितले की, जोशींच्या मेलवरून मेल आला होता, अशी कबुली या वेळी दिली. हा मेल आयडी मतपेढीचा असल्याचे लांडे यांनी सांगितले.
‘४ जुलैला आमदार भरत गोगावले यांनी जारी केलेला पक्षादेश माझ्या हातात दिला गेला. त्याची पोचपावती दिल्याचे आठवत नाही’, असे आमदार लांडे यांनी सांगितले. (MLA Disqualification Case)
(हेही वाचा – Gambhir Sreesanth Raw : लिजंड्स चषक आयोजन समिती गंभीर-श्रीसंत वादाची चौकशी करणार)
‘२१ जूनच्या वर्षा बंगल्यावरील बैठकीत जो व्हीप मिळाला याची पोचपावती दिली होती का ?’, या प्रश्नावर ‘मला व्हीप मिळाला नाही, गुलाबराव पाटील या व्यक्तीचा फोन आला होता, त्यावरून मी तिकडे गेलो होतो’, असे सांगितले. तसेच तेथील अटेंडन्स शीटवर माझीच सही असल्याचे लांडे म्हणाले.
८ डिसेंबर रोजी शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांना येण्यासाठी २० मिनिटे उशीर झाला. यावर उबाठा (Uddhav Thackeray) गटाचे वकील देवदत्त कामत यांनी ‘लांडे यांना उशीर झाल्याने सुनावणी विलंबाने सुरु झाली’, अशी नोंद रेकॉर्डवर ठेवण्याची विनंती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना केली आहे.
खरी माहिती न्यायालयासमोर ठेवत आहे – आमदार लांडे
अपात्रतेबाबत न्यायालयामध्ये साक्ष चालू आहे. खरी माहिती न्यायालयासमोर ठेवत आहे. खरी माहिती देण्यास मला अडचणीचे कारण नाही. शिवसेना पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाच्या निर्णयाने एकनाथ शिंदे यांना मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया आमदार लांडे (Dilip Lande) यांनी माध्यमांना दिली आहे. (MLA Disqualification Case)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community