MLA Disqualification Case : विधानसभा अध्यक्षांचा अवमान संजय राऊत, आदित्य ठाकरेंना भोवणार

367
शिवसेना अपात्र आमदार प्रकरणावर (MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवार, १० जानेवारी रोजी अंतिम निर्णय दिला. त्यानंतर उबाठा गटाकडून जोरदार टीका होऊ लागली. त्यामध्ये उबाठाचे नेते संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी टीका करताना राहुल नार्वेकर यांचा अवमानकारक उल्लेख केला. त्यामुळे या दोघांच्या विरोधात आता हक्कभंग प्रस्ताव आणण्याची तयारी सुरु झाली आहे.

असंसदीय भाषेत केली वक्तव्ये

आमदार अपात्र प्रकरणी  (MLA Disqualification Case) आलेल्या निकालानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी असंसदीय भाषेत वक्तव्य केले. हा निकाल लोकशाहीच्या इतिहासातला हा काळा दिवस आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. संजय राऊतांच्या या टीकेवर प्रतिवाद करताना उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी निवडणुकीत ज्याच्यासोबत मते मागितली त्यांच्याच विरोधात सरकार बनवले ही लोकशाही आहे का? तिथे राऊतांनी लोकशाहीला तिलांजली वाहिली नाही का? आमदार अपात्र प्रकरणचा  (MLA Disqualification Case)  निकाल संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया पार पाडून देण्यात आलेला आहे, असेही असे शंभुराज देसाई यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.