MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण; वकिलांना बोलू द्यायचे की नाही, हा विधानसभा अध्यक्षांचा अधिकार

आपलाच पक्ष हा अधिकृत शिवसेना पक्ष असल्याचा युक्तिवाद पुन्हा विधानसभा अध्यक्षांसमोर केला जाणार आहे

168
MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण; वकिलांना बोलू द्यायचे की नाही, हा विधानसभा अध्यक्षांचा अधिकार
MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण; वकिलांना बोलू द्यायचे की नाही, हा विधानसभा अध्यक्षांचा अधिकार
मुंबई : शिवसेनेच्या भवितव्याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी होत आहे. त्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून रणनीती आखण्यात आली असून, ठाकरे गटाच्या वतीने देवदत्त कामत आणि असीम सरोदे हे वकील बाजू मांडणार आहेत. मात्र, घटनादत्त अशा विधानभवनाच्या कार्यक्षेत्रात विधिमंडळ सदस्यांव्यतिरिक्त अन्य कोणालाही अध्यक्षीय कामकाजात भाग घेऊ देणे किंवा न देणे, हा सर्वस्वी विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे. त्यामुळे वकिलांना बाजू मांडण्याची संधी दिली जाते, की आमदारांनाच स्वतःचे म्हणणे मांडावे लागते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
गुरुवारी, १४ सप्टेंबरला दुपारी १२ वाजल्यापासून शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी होणार आहे. त्यासाठी विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये उपस्थित राहण्याची नोटीस शिवसेनेच्या आमदारांना बजावण्यात आली आहे. या सुनावणीसाठी ठाकरे गटाकडून रणनीती ठरविण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या सर्व आमदारांनी वकीलपत्र अध्यक्षांकडे सादर केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील देवदत्त कामत आणि वकील असीम सरोदे यांच्यामार्फत वकीलपत्र ठाकरे गटाकडून सादर करण्यात आले आहे.
दुसरीकडे, शिवसेनेच्या शिंदे गटाचे वकील सुनावणीवेळी उपस्थित राहतील. परंतु, ते बाजू मांडतील की स्वतः आमदार आपले म्हणणे मांडतील, हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
६ हजार पानी उत्तर
याआधी अध्यक्षांनी दिलेल्या नोटिशीला ठाकरे गटाच्या आमदारांनी वकिलांमार्फत वैयक्तिकरित्या ५०० पानी लेखी उत्तर दाखल केले होते. अगदी तशाच प्रकारे सुनावणी दरम्यान ठाकरे गटाच्या १४ आमदारांनी वकीलपत्रात आपले लेखी म्हणणे अध्यक्षांकडे सादर केले आहे. त्याचप्रमाणे शिंदे गटाकडून ६ हजार पानी उत्तर सादर करण्यात आले आहे. या लेखी उत्तराबरोबरच प्रत्यक्ष सुनावणीवेळी काही पुरावेही शिवसेनेच्या शिंदे गटाकडून सादर केले जाणार आहेत. आपलाच पक्ष हा अधिकृत शिवसेना पक्ष असल्याचा युक्तिवाद पुन्हा त्यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांसमोर केला जाणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.