MLA Disqualification Case : उद्धव ठाकरेंना Supreme Court कडून दिलासा मिळण्याची आशा उल्हास बापट यांनी सोडली

223
MLA Disqualification Case : उद्धव ठाकरेंना Supreme Court कडून दिलासा मिळण्याची आशा उल्हास बापट यांनी सोडली

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शिवसेना उबाठा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागेल, या आशेवर गेली दोन वर्षे बसलेल्या अॅड. उल्हास बापट यांची ठाकरे यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यामुळे पुढील काही दिवसांत महायुतीच्या विरोधात नवा ‘फेक नरेटीव्ह’ तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना मात्र बापट यांनी ‘आमदार अपात्रता प्रकरणी’ सर्वोच्च न्यायालयाकडून उद्धव ठाकरे यांना काही दिलासा मिळेल, याची आशा सोडली असल्याचे सांगितले. (MLA Disqualification Case)

शिंदे यांचे बंड आणि याचिका

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी जून २०२२ मध्ये शिवसेना पक्षात बंड केल्यानंतर ४० आमदारांनी त्यांना साथ देत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत असलेले ठाकरे सरकार पाडले आणि मतदारांनी निवडून दिलेल्या भाजपा-शिवसेनेचे सरकार स्थापन केले. शिंदे यांनी बंड केल्यानंतर, ठाकरे यांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात ‘शिंदे यांच्यासह १६ आमदारांनी पक्षातून बाहेर पडून कोणत्याच पक्षात प्रवेश न केल्याने त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी’ अशी याचिका दाखल केली. मात्र, शिंदे यांनी ‘आपण पक्षातून बाहेर पडलोच नाही, तर पक्षाच्या ५६ पैकी ४० आमदारांचे बहुमत असल्याने आम्ही शिवसेनेतच आहोत,’ अशी भूमिका घेतल्याने ठाकरे यांची अडचण झाली.

(हेही वाचा – इंदापूर, मावळ मुळे Mahayuti मध्ये वितुष्ट येऊ शकते ?)

आमदारकी रद्द होण्याची शक्यता कमी

या याचिकेवर अद्याप सर्वोच्च न्यायालयाने कोणताही निर्णय दिला नाही आणि विद्यमान आमदारांची पाच वर्षांची मुदत (आमदारांचा कार्यकाळ) संपेपर्यंत सर्वोच्च न्यायालय निकाल देईल, असे वाटत नाही, असे मत बापट यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय येणारी निवडणूक झाल्यानंतरच निकाल देईल असे वाटते. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांची आमदारकी रद्द नाही होणार. पण हा निकाल पुढील काळासाठी एक उदाहरण आणि मार्गदर्शक ठरू शकेल, असे बापट म्हणाले. (MLA Disqualification Case)

‘फेक नरेटीव्ह’ची तयारी

गेली दोन दिवस उद्धव ठाकरे पुण्यात असून शुक्रवारी ठाकरे यांनी सहकुटुंब बापट यांच्या पुण्याच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली. या भेटीबाबत विचारले असता ते म्हणाले, ठाकरे यांचा फोन आला आणि घरी येण्याची इच्छा व्यक्त केली. यात कोणताही राजकीय विषय नाही. ठाकरे यांनी बापट यांच्यानंतर लगेचच अॅड असिम सरोदे यांचीही भेट घेतल्याने पुढील काही दिवसांत महायुतीच्या विरोधात काहीतरी फेक नरेटीव्ह पसरले जाऊ शकते, अशी शक्यता नाकारता येत नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.