MLA Disqualification Case : अधिवेशन काळातही याचिकेवर सुनावणी घेणार – राहुल नार्वेकर

195
MLA Disqualification Case : अधिवेशन काळातही याचिकेवर सुनावणी घेणार - राहुल नार्वेकर
MLA Disqualification Case : अधिवेशन काळातही याचिकेवर सुनावणी घेणार - राहुल नार्वेकर

शिवसेनेच्या 16 आमदार अपात्रते संदर्भातील (MLA Disqualification Case) निर्णय घेण्याचा प्रयत्न आहे. सर्वोच्च न्यायालयानेही 31 डिसेंबरर्यंत निर्णय घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माझाही हाच प्रयत्न आहे. अधिवेशन काळात या अपात्रतेच्या याचिकेवर सुनावण्या घेऊन लवकरात लवकर निर्णय घेणार आहे, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले.

(हेही वाचा Kerala High Court : १४ वर्षांची मुलगी ९ महिन्यांची गरोदर; गर्भपाताविषयी काय म्हणाले केरळ उच्च न्यायालय…)

शिवसेना (Shiv Sena) आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणी सातत्याने मॅरेथॉन सुनावणी घेतली गेली. आताही संविधान प्रणित तरतुदींनुसार कार्यवाही होईल, असे आश्वासन राहुल नार्वेकर यांनी दिले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (CM Eknath Shinde) त्यांच्या गटातील 16 आमदारांच्या अपात्रता याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर हिवाळी अधिवेशन (Winter session) काळातदेखील नागपुरात नियमित स्वरूपात सुनावणी होणार आहे. 11 ते 20 डिसेंबरदरम्यान नागपुरात अंतिम सुनावणी होईल. गरजेनुसार 21 आणि 22 डिसेंबरलासुद्धा सुनावणी घेतली जाण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – P V Sindhu : तू कुणाला डेट केलं आहेस का, या प्रश्नावर सिंधूने दिलं ‘हे’ उत्तर)

असे होईल नागपुरातील कामकाज

नागपुरात उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार योगेश कदम यांची साक्ष नोंदविली जाणार आहे. शिवसेनेचे तत्कालीन प्रतोद आणि आताचे ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभु यांची शिंदे गटाच्या वकिलांसोबतची प्रश्नोत्तरे झाली आहेत. (MLA Disqualification Case)

आता शिंदे गटाच्या सदस्यांची साक्ष घेतली जाणार आहे. त्यांनाही ठाकरे गटाच्या वकिलांकडून घेतल्या जाणाऱ्या उलटतपासणीला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे प्रक्रियेला वेळ लागू शकेल, असा अंदाज लावला जात आहे.

संविधानाच्या तरतुदींनुसारच सभागृहाचे काम चालणार 

राहुल नार्वेकर पुढे बोलताना म्हणाले की, सभागृहाचे कामकाज किंवा देश-राज्यात शासन चालवण्याचे काम डॉ. बाबासाहेबांच्या संविधानाच्या आधारावरच चालते. आजच्या पावन दिनी मी महाराष्ट्रातील जनतेला आश्वासित करू इच्छितो की, संविधानाने दिलेल्या नियम आणि तरतुदींनुसारच हिवाळी अधिवेशनाचे कामकाज चालेल. संविधानाच्या तरतुदी (Provisions of the Constitution) आणि नियमांची कुठेही पायमल्ली होणार नाही. नियमांनुसार सभागृह चालवले जाईल. सर्व आमदारही संविधानाची शपथ घेऊन सभागृहात काम करत असतात. (MLA Disqualification Case)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.