साधारण दीड वर्षांपूर्वी महाराष्ट्रात, मुंबई-सूरत-गुवाहाटी-गोवा आणि परत मुंबई, अशा प्रवासानंतर झालेलं सत्तांतर आणि त्याला सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोगात दिलेलं आव्हान, अखेर विधानसभा अध्यक्षांच्या (MLA Disqualification Case) कोर्टात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकारी आमदारांनी शिवसेनेत केलेलं बंड हे पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्रतेच्या (MLA Disqualification Case) कारवाईला पात्र ठरते का, हा कळीचा प्रश्न आहे. त्याचा फैसला अजून झालेला नाही आणि पुढील काही तासात त्यावर निर्णय होणे अपेक्षित आहे व ही जबाबदारी (MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आहे. या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे लक्ष लागून राहिले आहे.
(हेही वाचा – उत्तर प्रदेश एटीएसने आणखी दोन ISIS दहशतवाद्यांना केली अटक; दहशतवादी अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे माजी विद्यार्थी)
या पार्श्वभूमीवर आज कोण कोणत्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असणार आहे हे पाहूया –
शिवसेना शिंदे गटाचे १६ आमदार
१. एकनाथ शिंदे
२. चिमणराव पाटील
३. अब्दुल सत्तार
४. तानाजी सावंत
५. यामिनी जाधव
६. संदीपान भुमरे
७. भरत गोगावले
८. संजय शिरसाठ
९. लता सोनवणे
१०. प्रकाश सुर्वे
११. बालाजी किणीकर
१२. बालाजी कल्याणकर
१३. अनिल बाबर
१४. संजय रायमूळकर
१५. रमेश बोरनारे
१६. महेश शिंदे
(हेही वाचा – CM Eknath Shinde : राज्यात १० हजार हेक्टरवर बांबू लागवड होणार)
उद्धव ठाकरे गटाचे आमदार
१. अजय चौधरी
२. रवींद्र वायकर
३. राजन साळवी
४. वैभव नाईक
५. नितीन देशमुख
६. सुनिल राऊत
७. सुनिल प्रभू
८. भास्कर जाधव
९. रमेश कोरगावंकर
१०. प्रकाश फातर्फेकर
११. कैलास पाटील
१२. संजय पोतनीस
१३. उदयसिंह राजपूत
१४. राहुल पाटील
एकनाथ शिंदे यांनी जून २०२२ मध्ये बंड पुकारून भाजपशी युती केली आणि ते मुख्यमंत्री झाले. या घटनेनंतर उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि याचिका दाखल केली. त्यावर आता बुधवार १० जानेवारी रोजी निकाल (MLA Disqualification Case) जाहीर करण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. अशातच दोन्ही पक्ष आपल्या विजयाचा दावा करत आहेत. त्यामुळे निकाल कोणाच्या बाजूने लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. (MLA Disqualification Case)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community