शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या फुटीनंतर सर्वोच्च न्यायालयात दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात याचिका दाखल केलेल्या आहेत. या याचिकांवर तातडीने निर्णय घेण्याची विनंती उबाठा गट आणि शरद पवार गटाने केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुनावणी सातत्याने लांबणीवर पडत आहे. यापूर्वी सुनावणी दोन आठवड्यांसाठी लांबणीवर टाकण्यात आली होती. ही सुनावणी १७ सप्टेंबर रोजी होणार असल्याचे समोर आले होते. आता निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर आता २१ ऑक्टोबरला सुनावणी होईल. (MLA disqualification Case)
(हेही वाचा – Virat Kohli : सचिनचा ‘हा’ विक्रम मोडण्यासाठी विराटला हव्या आणखी ५८ धावा)
दोन्ही पक्षांकडून याचिका दाखल
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर दोन्ही पक्षांकडून आमदार अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. शिवसेना उबाठा गटाकडून सुनील प्रभु आणि शरद पवार गटाकडून जयंत पाटील यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकांवर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपावला होता.
अध्यक्षांच्या निर्णयानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव
मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पात्र ठरवली. तसेच आमदारांना पात्र ठरवले. त्यानंतर पुन्हा उबाठा आणि शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. (MLA disqualification Case)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community