विधानसभा आमदार अपात्रतेबाबतच्या (MLA Disqualification) याचिकांवरील सुनावणी लांबणीवर गेली आहे. शनिवार-रविवारीही सुनावणी घेणार असून दोन्ही पक्षकाराकडून सहकार्य झाल्यास वेळेत सुनावणी पूर्ण करता येईल, मात्र अर्ज अजूनही दाखल केले जात असून सुनावणीसाठी अधिक वेळ लागल्यास आणि ३१ डिसेंबर आधी सुनावणी पूर्ण करणे शक्य न झाल्यास सर्वोच्च न्यायालयाकडे वेळ मागितला जाईल, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाबरोबर आमदार अपात्रता सुनावणीलाही सुरुवात झाली आहे. यासाठी विधानसभा आणि सुनावणी, असे बारा बारा तास काम करावे लागणार आहे.
(हेही वाचा – Pune: प्रसिद्ध ‘पुना गेस्ट हाऊस’ला मिळाला टपाल तिकिटावर झळकण्याचा बहुमान )
वेगाने सुनावणी पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे
न्याय संस्था आणि विधिमंडळ या दोन्ही संस्था आपापल्या कार्यकक्षेत राहून काम करत आहेत. यात अंतिम शब्द कोणाचा असेल, असे होत नाही. त्यामुळे न्यायालयाने ३१ डिसेंबरपर्यंत सुनावणी पूर्ण करून निर्णय देण्यास सांगितले आहे. त्यानुसार, वेगाने सुनावणी पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, मात्र तरीही अधिक वेळ लागण्याची शक्यता निर्माण झाल्यास न्यायालयाला कळवले जाईल, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नागपूर येथील पत्रकारांच्या अधिवेशनकालिन निवासस्थानी अनौपचारिक संवादावेळी दिली.
हेही पहा –