शिवसेना पक्षाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतची (MLA Disqualification) सुनावणी विधानसभा अध्यक्षांसमोर सोमवार, २५ सप्टेंबरपासून होण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे आणि मुख्यमत्री एकनाथ शिंदे या दोघांना नोटीस पाठवली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर सोमवारपासून सुनावणी सुरु होण्याची शक्यता आहे.
या विषयावर मागील आठवड्यात सुनावणी झाली होती, तेव्हा आमदारांनी एक आठवड्याची वेळ मागितली होती. 14 सप्टेंबर रोजी आमदार अपात्रतेबाबतची (MLA Disqualification) सुनावणी विधानसभा अध्यक्षांसमोर झाली होती. यावेळी दोन्ही गटांनी आपली बाजू मांडली. यावेळी विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटांना कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी एक आठवड्याचा वेळ दिला. तसेच 18 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने वेळ घ्यायला विलंब लागत असल्याबद्दल सुनावले. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर आमदार अपात्रतेच्या (MLA Disqualification) याचिकांवरून हालचालींना वेग आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिल्लीत जाऊन कायदेतज्ज्ञांची भेट घेतली आणि आमदार अपात्रता सुनावणीबाबत चर्चा केली. यावेळी निर्णय घ्यायला वेळ लावणार नाही. तसेच, घाई करून चालणार नाही असे नार्वेकर म्हणाले.
(हेही वाचा Lonavala Tourism Development : पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारचे पाऊल, लोणावळ्यात उभारणार ‘ग्लास स्कायवॉक’)
Join Our WhatsApp Community