MLA Disqualificaton Case : आमदार अपात्रतेच्या दोन्ही गटांच्या याचिका फेटाळल्या; दोन्ही गटांचे आमदार पात्र

274
आमदार अपात्रतेच्या मुद्यावर (MLA Disqualificaton Case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवार, १० जानेवारी रोजी अंतिम निर्णय देताना आमदार अपात्रतेच्या दोन्ही गटांच्या याचिका फेटाळून लावल्या. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गटातील सर्व आमदार पात्र (MLA Disqualificaton Case) ठरले आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी समतोल निर्णय घेत शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवलेलं नाही. मात्र त्याचवेळी शिंदेंचीच शिवसेना ही खरी शिवसेना असल्याचा निकालही त्यांनी दिला.
आमदार अपात्रतेच्या मुद्यावर (MLA Disqualificaton Case) बुधवार, १० जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी या प्रकरणी अंतिम निर्णयाचे विधिमंडळातील मध्यवर्ती सभागृहात वाचन केले. त्यावेळी महत्वाचा निर्णय दिला. यावेळी बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या पक्ष घटना. नेतृत्व आणि संघटन फळी या तीन मुद्यावर निकाल दिला. त्यामध्ये शिवसेनेची २०१८ नंतरच्या पक्ष घटनेत केलेल्या बदलावरून नेतृत्वाची फळी अस्पष्ट होत नाही, असे सांगितले.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांनी ठाकरेंपासून वेगळा सवतासुभा मांडत भाजपशी घरोबा केला आणि सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिंदे यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा केला. नंतर निवडणूक आयोगाने हा त्यांच्या बाजूने निर्णय घेत त्यांचा हा दावा योग्य ठरवला. या दरम्यान ठाकरे गटाच्या वतीनं शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या विरोधात पक्षांतरबंदी कायद्यान्वये याचिका दाखल केली. त्याचवेळी शिंदे गटाच्या वतीनंही ठाकरे गटातील १४ आमदारांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. या दोन्ही गटाच्या अपात्रतेच्या याचिका राहुल नार्वेकरांनी फेटाळल्या आहेत. त्यामुळे कोणताही आमदार अपात्र ठरलेला नाही.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.